11.22.2011

मन (kavita)

मन माझे वेडे
फुलपाखरु झाले
दुनिया सारी फिरले
संध्याकाळी परत आले

मी विचारले त्याला
काय काय पाहिले
शांतपणे मला म्हणाले
तु का मला सोडले

मी म्हणालो त्याला
तुझ्या इच्छेवर तर सगळे चालते
नाहीतर स्वतालाच
नाराज होऊन मोलते

विचार केला मनाने
म्ह्णाले खरंच सांगु का
सांगितले तर मला
पुन्हा फिरायला सोडु नका

मी दिला होकार
मनाने सोडला सुस्कार
म्हटले पुन्हा जाणार नाही
दुनियेतील दुख पाहणार नाही
___________
लक्ष्मण शिर्के