आता पाऊस येईल
आभाळ काळकुट्ट झालय
ढग गर्जु लागलेत
हवा जोरजोरात वाहतेय
प्राणि पक्षी किलबिल करताहेत
आता पाऊस येईल
पावसासाठी गावकरी वडभोजन करतील
पावशा पावशा म्हणत वरुण राजाला स्मरतील
पीक पेरणीसाठी शेती सुसज्ज ठेवतील
पावसाच्या पहिल्या धारेची वाट पाहत राहतील
नुकतच मोराच थुईथुई नाचण चालु होईल
रानपाखरांच इकडुन तिकडं बागडणं राहिल
झाडांच्या फांद्या पानांच सळसळणं राहिल
चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पाहिल
पावसाच्या सरीवर सरी कोसळतील
दुथडी भरुन वाहणार्या नद्या समुद्रात मिसळतील
पावसाच्या पुर्वसंध्येला गुरंढोरं माघारा वळतील
शेतकरयाच्या बैलगाड्या सुसाट घराकडे पळतील
आनंदात कोकिळा कुहुकुहु गाईल
राघु मैनेचंसुद्धा गुटर्गु चालु होईल
सृष्टीला नवीनच हिरवागार बहर येईल
प्रत्येक छोटामोठा जीव त्यावर बागडत राहिल
सावधान आता रिमझिम चालु होईल
छत्र्या रेनकोटची रस्त्यावर गर्दी होईल
लवकर आपापली घरे गाठा
आता पाऊस येईल
__________
लक्ष्मण शिर्के