7.27.2010

विठुराया

पहा तो विठुरायाचा वारकरी
कसा भगवा पताका खांद्यावर घेउन जोशात चाललाय....
उन, पाऊस, वारा..
कशाचही भान नाही त्याला..
मळकी बंडी, भोकं पडलेलं धोतर आणि दोन हात मुंडासं...
सुरकुत्या पडलेला चेहरा.. चेहरयावर दाढी वाढलेली...
मनात फक्त एकच ओढ... भगवंत भेटीची..
कधी एकदा भगवंताचं दर्शन घेतोय ...
अखेर देव नगरीत दाखल होई पावेतो हातापायाला गोळे आलेले..
कसतरी पाय ओढत ओढत पांडुरंगाचं दर्शन
आणि त्याच वेळी भगवंत भेटल्यावर डोळयातुन वाहिलेला आनंद....
कपाळी कानी गळी चंदनाचा गंध...
. मनी फक्त भगवंत... मुखी बोलतो पांडुरंग......
कधी कधी मला पण भरुन येतं......................
आणि मन बोलु लागतं...

विठुराया अशीच अवितर माया शेवटपर्यंत या तुझ्या भक्त लेकरांवर ठेव....

___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment