7.27.2010

आता पाऊस येईल

आता पाऊस येईल
आभाळ काळकुट्ट झालय
ढग गर्जु लागलेत
हवा जोरजोरात वाहतेय
प्राणि पक्षी किलबिल करताहेत
आता पाऊस येईल

पावसासाठी गावकरी वडभोजन करतील
पावशा पावशा म्हणत वरुण राजाला स्मरतील
पीक पेरणीसाठी शेती सुसज्ज ठेवतील
पावसाच्या पहिल्या धारेची वाट पाहत राहतील

नुकतच मोराच थुईथुई नाचण चालु होईल
रानपाखरांच इकडुन तिकडं बागडणं राहिल
झाडांच्या फांद्या पानांच सळसळणं राहिल
चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पाहिल

पावसाच्या सरीवर सरी कोसळतील
दुथडी भरुन वाहणार्या नद्या समुद्रात मिसळतील
पावसाच्या पुर्वसंध्येला गुरंढोरं माघारा वळतील
शेतकरयाच्या बैलगाड्या सुसाट घराकडे पळतील

आनंदात कोकिळा कुहुकुहु गाईल
राघु मैनेचंसुद्धा गुटर्गु चालु होईल
सृष्टीला नवीनच हिरवागार बहर येईल
प्रत्येक छोटामोठा जीव त्यावर बागडत राहिल

सावधान आता रिमझिम चालु होईल
छत्र्या रेनकोटची रस्त्यावर गर्दी होईल
लवकर आपापली घरे गाठा
आता पाऊस येईल

__________
लक्ष्मण शिर्के

कल्पनेतलं जग

कल्पनेतलं जग मी उभ केलं होतं
मन हसत होत ह्रदय गीत गात होत
राहिलं साहिलं अस्तित्व मानानं जगत होतं
कुणापुढे लाचारपणे स्वाभिमान झुकवत नव्हतं

कधी मनात येता आकाशी जात होतं
तुफान वेगाच्या विमानाला शिवुन येत होतं
सात्विक मिळणारया सुखानं भारावुन जात होतं
कल्पनेतलं जग अस स्वप्नात जात होतं

ती न मिळालेलं दुख उराशी होतं
नकारात तिच्या मन सुख मानत होतं
दुसरीकडे कधीही चित्त लागत नव्हतं
मनाच संतुलन ढळलं तरी काहीच बिघडत नव्हतं

आताशी कुठे मनाला जीवन समजत होतं
परिस्थितीशी जगण्याची सांगड घालत होतं
सकाळच्या सोनेरी किरणांची उब घेत होतं
मन माझं कल्पनेला जोर देत होतं
__________
लक्ष्मण शिर्के

विठुराया

पहा तो विठुरायाचा वारकरी
कसा भगवा पताका खांद्यावर घेउन जोशात चाललाय....
उन, पाऊस, वारा..
कशाचही भान नाही त्याला..
मळकी बंडी, भोकं पडलेलं धोतर आणि दोन हात मुंडासं...
सुरकुत्या पडलेला चेहरा.. चेहरयावर दाढी वाढलेली...
मनात फक्त एकच ओढ... भगवंत भेटीची..
कधी एकदा भगवंताचं दर्शन घेतोय ...
अखेर देव नगरीत दाखल होई पावेतो हातापायाला गोळे आलेले..
कसतरी पाय ओढत ओढत पांडुरंगाचं दर्शन
आणि त्याच वेळी भगवंत भेटल्यावर डोळयातुन वाहिलेला आनंद....
कपाळी कानी गळी चंदनाचा गंध...
. मनी फक्त भगवंत... मुखी बोलतो पांडुरंग......
कधी कधी मला पण भरुन येतं......................
आणि मन बोलु लागतं...

विठुराया अशीच अवितर माया शेवटपर्यंत या तुझ्या भक्त लेकरांवर ठेव....

___________
लक्ष्मण शिर्के