4.05.2010

कधी येशील तु इथे

कधी येशील तु इथे
सांग सख्या मला
अजुन किती वेळ
लावशील वाट पहायला
___________
लक्ष्मण शिर्के

अबोल माझ्या डोळ्यात

अबोल माझ्या डोळ्यात
नेहमीच तु पहात रहा
तुझ्या कोकिळ गळ्यातुन
गीत माझे गात रहा
___________
लक्ष्मण शिर्के

तुझ्या डोळ्यात पाहता

तुझ्या डोळ्यात पाहता
मीच मला दिसते
तुझ्यात असलेली मी पाहुन
गालातल्या गालात हसते
___________
लक्ष्मण शिर्के

प्रेम हे नवनिर्माण होत असतं

प्रेम हे नवनिर्माण होत असतं
त्याचा विनाश कधीच नसतो
मनुष्यप्राणी उगीचच प्रेमाची
"वचने" देत बसलेला असतो
___________
लक्ष्मण शिर्के

एकांतात बसतो जेव्हा

एकांतात बसतो जेव्हा
मनात आठवणींच जाळ पसरतं
तासन्तास विचारांत रमतो
वेळ अन काळाचं भानच विसरतं
___________
लक्ष्मण शिर्के

प्रेमाची आणि ह्रदयाचं नाती

प्रेमाची आणि ह्रदयाचं नाती
खुपच जवळची असतात
जस शरीर आणि आत्मा
एकमेकाशिवाय रहात नसतात
___________
लक्ष्मण शिर्के

तस पहायला गेलं तर

तस पहायला गेलं तर हल्ली
प्रेमाचा बदलता आरसा आहे
सध्याच्या या फेशनेबल जमान्यात
पाश्चात्य संस्कृतीचा वारसा आहे
___________
लक्ष्मण शिर्के

विरहातल्या प्रेमाची एक

विरहातल्या प्रेमाची एक
नागमोडी वाट असते
कधी ते खळखळुन ह्सते
तर कधी एकटेच रुसुन बसते
___________
लक्ष्मण शिर्के

जरा दुसरयाचं पण दुख पहावं

स्वताची रडगाणी नेहमीचीच असतात
जरा दुसरयाचं पण दुख पहावं
कृती नका पण शब्दानं का होईना
त्याला आत्मविश्वासाचं बळ द्यावं
___________
लक्ष्मण शिर्के

विश्वास जेव्हा रहात नाही

विश्वास जेव्हा रहात नाही
जवळचे सुद्धा परके वाटतात
हळुहळु त्यांच्याविषयी पण
आपल्या मनातील भावना आटतात
___________
लक्ष्मण शिर्के

दुखात मोजकेच असतात

खुप असतात मित्र, सगेसोयरे
दुखात मोजकेच असतात
कधी कधी तर अनेकजण
स्वतावरील विश्वास हरवुन बसतात
___________
लक्ष्मण शिर्के

कधी कधी अनोळखीच

कधी कधी अनोळखीच
जास्त जवळचे वाटतात
थोड्यासाठी असतो एकत्र
नंतर.. अनेक वाटा फुटतात
___________
लक्ष्मण शिर्के

आठवतं प्रिये तुला

तो चंद्र आणि मी
आठवतं प्रिये तुला
दोघेपण कसे गोड हसतो
हे सांगत होतीस मला
___________
लक्ष्मण शिर्के

बोटावर मोजण्याइतपतच

वरवर बोलणारे मित्र
कितीतरी मिळतात
बोटावर मोजण्याइतपतच
आपल्यासाठी हळहळतात
___________
लक्ष्मण शिर्के

जिंकण्यातलं शल्य उमजतं

चुक झाली तरच
सारं काही समजतं
पराभव जेव्हा पचवतो
तेव्हाच.. जिंकण्यातलं शल्य उमजतं
___________
लक्ष्मण शिर्के

माणसाच जीवनच अस

माणसाच जीवनच अस
दोन बाजुचं असत
दुखाशिवाय सुख कधीच
पुर्ण होत नसतं
___________
लक्ष्मण शिर्के

कातरवेळचा मंद वारा

कातरवेळचा मंद वारा
माझ्याशी नेहमी बोलत असतो
तिच्या मनातील भाव भावना
खुल्या मनाने सांगत असतो
___________
लक्ष्मण शिर्के

तु समोर असल्यावर

तु समोर असल्यावर
आसपास कुणी नसाव
एकसारख तासन्तास
वाटतं पहात बसाव
___________
लक्ष्मण शिर्के

त्या दिवशी निरोप घेताना

त्या दिवशी निरोप घेताना
माझ्याकडे बघुन गालात हसलीस
पहिल्यांदाच काळजात धक होऊन
मनात माझ्या रुतुन बसलीस
___________
लक्ष्मण शिर्के

तुझ्या प्रेमाची ती भाषा

तुझ्या प्रेमाची ती भाषा
कधीच कळली नाही मला
जेव्हा जेव्हा व्यक्त करायचीस
हसण्यावारी न्यायचो तुला
___________
लक्ष्मण शिर्के

कस सांगु मी तुला

माझं तुझ्यावर असणारं प्रेम
कस सांगु मी तुला
अजुनही वाटेकडेच पाहतोय
कधी समजुन घेशील मला
___________
लक्ष्मण शिर्के

तुझ्या फिलिंग्स समजत नाहीत

प्रेमाच्या भावना काय आहेत
माझ्या मलाच उमजत नाहीत
खुप प्रयत्न करतोय जाणायचा
तुझ्या फिलिंग्स समजत नाहीत
___________
लक्ष्मण शिर्के

झालोय मी दिवाना

तुच मला भेट दिलास
तो अबोल प्रेमाचा नजराना
त्या मुक्या शब्दांनी सुद्धा
झालोय मी दिवाना
___________
लक्ष्मण शिर्के

मला कळतय ग

मला कळतय ग तुझं
उदास आणि बैचेन मन
मी पण तुझ्याच आठवणीत
हरवुन जातो प्रत्येक क्षण
___________
लक्ष्मण शिर्के

सगळे असतात सगेसोयरे

सगळे असतात सगेसोयरे
परकं कुणीच कुणाचं नसतं
एकाच विधात्याची लेकरे आपण
मन माझं उगीचच हसतं
___________
लक्ष्मण शिर्के

भरुन आलेल्या जखमांसाठी

भरुन आलेल्या जखमांसाठी
मी पुन्हा पुन्हा रडत नाही
आलच जरी उर भरुन
डोळ्यातुन थेंबसुद्धा पडत नाही
___________
लक्ष्मण शिर्के

तासन्तास पहात बसतात

तुझे शब्द ऐकण्यासाठी
कान नेहमी आतुर असतात
तुझ्या वाटेकडे डोळेसुद्धा
तासन्तास पहात बसतात
___________
लक्ष्मण शिर्के

भोळ्याभाबड्या मनाला तु

भोळ्याभाबड्या मनाला तु
नेहमीच का समजावतेस
चुक असते माझीच ग
उगीच स्वतावर आरोप लावतेस
___________
लक्ष्मण शिर्के

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मनात आठवत राहिल
दिलासा देणारं तुझं बोलण
मनाला नेहमीच हसवत राहिल
___________
लक्ष्मण शिर्के

जेव्हा मी तिचे

जेव्हा मी तिचे ते
केविलवाणे डोळे पाहतो
क्षणभर मन हेलावुन जात
नंतर समजुन काढत राहतो
___________
लक्ष्मण शिर्के

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर
माणुस बदलत असतो
नंतर फक्त एवढच म्हणतो
"कुणीच कुणाचा नसतो"
___________
लक्ष्मण शिर्के

आपलं कुणीतरी असाव

कातरवेळी आठवणारं
आपलं कुणीतरी असाव
आपणही त्याच वेळी
आठवण काढत बसावं
___________
लक्ष्मण शिर्के

आमच्या भेटी अर्धवट घडतात

सकाळच्या साखर झोपेतही
मला तिची स्वप्ने पडतात
ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी
आमच्या भेटी अर्धवट घडतात
___________
लक्ष्मण शिर्के

दुसरयाच कुणीतरी निवडली होती

आयुष्यात ती मुलगी
खुप मला आवडली होती
बर झालं लवकर समजलं
तिला... दुसरयाच कुणीतरी निवडली होती
___________
लक्ष्मण शिर्के

अशाच एका कातरवेळी

अशाच एका कातरवेळी
माझी तिची भेट झाली
पहिली आणि शेवटचीच भेट
दोन अश्रु ओघळले गाली
___________
लक्ष्मण शिर्के

डोळे उघडे असले तरी

डोळे उघडे असले तरी
स्वप्नांचा भास होतो
तु जरी दिसत नसलीस
तुला पाहण्याचा हव्यास येतो
___________
लक्ष्मण शिर्के

डोळ्यात तिच्या अश्रु

डोळ्यात तिच्या अश्रु मला
कधीही पाहवणार नाही
म्हणुन तर न भेटायचं ठरवलंय कारण....
मलापण अश्रुंविना राहवणार नाही
___________
लक्ष्मण शिर्के

त्या धुंद प्रेमाचा ओलावा

त्या धुंद प्रेमाचा ओलावा
तिच्या पाकळ्यात भरुन राहिलाय
तिने अजुनही तो
आतच जपुन ठेवलाय
___________
लक्ष्मण शिर्के

माझ्या आठवांशी मिळतात

सुख आणि दुख दोन्ही
आयुष्याशी नेहमीच खेळतात
राहुन राहुन पुन्हा ते
माझ्या आठवांशी मिळतात
___________
लक्ष्मण शिर्के

मी (कविता)

कसाबसा संकटातुन सावरुन
चालायला मी सुरुवात केली
जुने वाटसरु पुन्हा भेटले...... म्हणाले
अशी कशी तुझी गत झाली

काय बोलु सुचतच नव्हतं
शांतपणे मी चालत होतो
हसत होते येणारे जाणारे..... कारण
मी पुन्हा तेच गीत गात होतो

अनेक जण सल्ला द्यायचे
चांगले कधी ऐकलेच नाही
माहितच नव्हतं असं होईल... म्हणुन
साधं मन माझं शिकलेच नाही

एक वेळ अशी होती
सन्मानाचे हार माळत होतो
हल्ली मान तर सोडुनच द्या... आजकाल
अपमानाचे जीणे गिळत राहतो

स्वाभिमानानं समाजात जगत होतो
आज न आवडणारी गोष्ट पण भोगतो
भविष्यकाळ चांगला व्यतीत जावा... त्यासाठी
कुणी काही सांगितलं तरी ऐकतो

कुणी नशीबाला दोष देतो
कुणी परिस्थितीला नावे ठेवुन जातो
पण मी वेडा मात्र असा.... वेड्यासारखा
माझ्याच मनाला दोष देवुन राहतो
__________
लक्ष्मण शिर्के

आठवतं का तुला (कविता)

आठवतं का तुला
आठवतं का तुला तुझा मी पहिल्यांदा घेतलेला हातात हात
तु सुद्धा तुझ्या बाजुने देत होतीस बिंधास्तपणे साथ
अजुनही कित्येक वेळा नजरेसमोरुन हटत नाही तो क्षण
दोघेसुद्धा शपथावर शपथांची करत होतो बरसात

आठवतं का तुला ते माझं तुला लाडिवाळ बोलणं
अन माझ्या नजरेतलं भय तु हळुच हेरणं
भिती वाटुन सुद्धा पुन्हा पुन्हा तुला एकटक पहात राहणं
अन तु सुद्धा उघड्या डोळ्यांनी माझ्या स्वप्नात रमुन जाणं

आठवतं का तुला ते भुतकाळातले क्षण
कितीतरी आपण गुंतवायचो एकमेकांच्या मनात मन
उंच टेकडीवर दुर दुर आपण दोघे बसलेलो असायचो
तासन्तास निशब्द राहुन गालातल्या गालात हसायचो

आठवतं का तुला मी जेव्हा तुला चिडवायचो
नाक आणि गाल तुझी लालभडक व्हायचे
पण त्या रागात सुद्धा होता प्रेमाचा उबारा
माझं मन तुझ्या हळव्या मनास खुप वेळ समजवायचे

आठवतय मला ... मी नेहमीच चुकायचो
माझ्या प्रत्येक चुकीला तुलाच दोषी ठरवायचो
तु पन तुझी चुक नसुनसुद्धा स्वतालाच दोषी म्हणायची
अन त्याक्षणीच माझी चुक मला आपोआप कळायची

आठवतय मला ... मी नेहमीच तुला पावसात चल म्हणायचो
लगेच दुसरया दिवशी तुला सर्दी डोकेदुखी व्हायची
आवाज बदललेला ऐकताच मी समजुन जायचो
अन त्याक्षणीच माझी चुक मला आपोआप कळायची

आता फक्त आपणाला आठवाच हव्यात
न मिळालेल्या गोष्टी मनात साठवायलाच हव्यात
नाही करु शकलो आयुष्यभरासाठी प्रेम......... पण...
कल्पनेच्या भावविश्वात काही गोष्टी भेटवायलाच हव्यात.........
___________________
लक्ष्मण शिर्के