4.05.2010

आठवतं का तुला (कविता)

आठवतं का तुला
आठवतं का तुला तुझा मी पहिल्यांदा घेतलेला हातात हात
तु सुद्धा तुझ्या बाजुने देत होतीस बिंधास्तपणे साथ
अजुनही कित्येक वेळा नजरेसमोरुन हटत नाही तो क्षण
दोघेसुद्धा शपथावर शपथांची करत होतो बरसात

आठवतं का तुला ते माझं तुला लाडिवाळ बोलणं
अन माझ्या नजरेतलं भय तु हळुच हेरणं
भिती वाटुन सुद्धा पुन्हा पुन्हा तुला एकटक पहात राहणं
अन तु सुद्धा उघड्या डोळ्यांनी माझ्या स्वप्नात रमुन जाणं

आठवतं का तुला ते भुतकाळातले क्षण
कितीतरी आपण गुंतवायचो एकमेकांच्या मनात मन
उंच टेकडीवर दुर दुर आपण दोघे बसलेलो असायचो
तासन्तास निशब्द राहुन गालातल्या गालात हसायचो

आठवतं का तुला मी जेव्हा तुला चिडवायचो
नाक आणि गाल तुझी लालभडक व्हायचे
पण त्या रागात सुद्धा होता प्रेमाचा उबारा
माझं मन तुझ्या हळव्या मनास खुप वेळ समजवायचे

आठवतय मला ... मी नेहमीच चुकायचो
माझ्या प्रत्येक चुकीला तुलाच दोषी ठरवायचो
तु पन तुझी चुक नसुनसुद्धा स्वतालाच दोषी म्हणायची
अन त्याक्षणीच माझी चुक मला आपोआप कळायची

आठवतय मला ... मी नेहमीच तुला पावसात चल म्हणायचो
लगेच दुसरया दिवशी तुला सर्दी डोकेदुखी व्हायची
आवाज बदललेला ऐकताच मी समजुन जायचो
अन त्याक्षणीच माझी चुक मला आपोआप कळायची

आता फक्त आपणाला आठवाच हव्यात
न मिळालेल्या गोष्टी मनात साठवायलाच हव्यात
नाही करु शकलो आयुष्यभरासाठी प्रेम......... पण...
कल्पनेच्या भावविश्वात काही गोष्टी भेटवायलाच हव्यात.........
___________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment