कसाबसा संकटातुन सावरुन
चालायला मी सुरुवात केली
जुने वाटसरु पुन्हा भेटले...... म्हणाले
अशी कशी तुझी गत झाली
काय बोलु सुचतच नव्हतं
शांतपणे मी चालत होतो
हसत होते येणारे जाणारे..... कारण
मी पुन्हा तेच गीत गात होतो
अनेक जण सल्ला द्यायचे
चांगले कधी ऐकलेच नाही
माहितच नव्हतं असं होईल... म्हणुन
साधं मन माझं शिकलेच नाही
एक वेळ अशी होती
सन्मानाचे हार माळत होतो
हल्ली मान तर सोडुनच द्या... आजकाल
अपमानाचे जीणे गिळत राहतो
स्वाभिमानानं समाजात जगत होतो
आज न आवडणारी गोष्ट पण भोगतो
भविष्यकाळ चांगला व्यतीत जावा... त्यासाठी
कुणी काही सांगितलं तरी ऐकतो
कुणी नशीबाला दोष देतो
कुणी परिस्थितीला नावे ठेवुन जातो
पण मी वेडा मात्र असा.... वेड्यासारखा
माझ्याच मनाला दोष देवुन राहतो
__________
लक्ष्मण शिर्के
very nice!
ReplyDelete