9.25.2009

नक्कीच मी विचार करेन

नक्कीच मी विचार करेन
सल्ल्याचा या तुझ्या
आता घावच बसणार नाही
ह्रद्यावर या माझ्या
____________
लक्ष्मण शिर्के

का भागत नाही भूक

तुमचे म्हटले की बरोबर
आमच्याकडे बोटे वळली की चुक
इतके आम्हाला चुकवून सुद्धा
तुमची का भागत नाही भूक
____________
लक्ष्मण शिर्के

ह्रदय खूप कट्टर बनतय

वेड्या मनाची काय सांगू गाथा
हे दुखालाच सुख म्हनतय
तलवारीचे घाव झेलून झेलून
हे ह्रदय खूप कट्टर बनतय
____________
लक्ष्मण शिर्के

नको आता पाहु

आज ना उद्या सावरेनच मी
काय करू आता जळुन
तेव्हाच का समजला नाहीस तू
नको आता पाहु मागे वळुन
____________
लक्ष्मण शिर्के

तुझ्या पापणीची आस

तुझ्या पापणीची आस मला आहे
क्षणभर समोर असल्याचा भास होत आहे
समोर ये एकदाच अशी तू
मी प्रेम वलयाचा श्वास घेत आहे
____________
लक्ष्मण शिर्के

जीवनाची रीत आहे

अग ही जीवनाची रीत आहे आपल्या
ज्या बंद पापणीत माझ्या आठवणी
पण धीर धार मन आवर खरे
त्या डोळ्यात पण चांगली जागा घेईल कुणी
____________
लक्ष्मण शिर्के

उणीव भासेल तुझी

मी आयुष्य माझे सावरेन नक्कीच
पण उणीव भासेल तुझी खूप मला
प्रत्येक पायरीवर पाउल टाकताना मी
आठवेन नेहमीच जीवनात तुला
____________
लक्ष्मण शिर्के

लाख विनवण्या करत होतो

त्याच वेळी मी बोलत होतो तुला
नाही दिले तू माझ्या बोलन्याकडे लक्ष
लाख विनवण्या करत होतो तुला
नाहीस लावला त्यावेळेस सोक्ष मोक्ष
____________
लक्ष्मण शिर्के

परिस्थिती तू विसरत नाहीस

कितीही गोन्धळलिस बावरलिस
परिस्थिती तू विसरत नाहीस
कुठल्याहि भावबंधात अडकून
हल्ली माझ्यापुढे हात पसरत नाहीस
____________
लक्ष्मण शिर्के

माझ्या हसण्याला तू

माझ्या हसण्याला तू पण
खळखळुन दिलीस दाद
त्या शीतल चंद्राच्या छायेत पण
मज वाटली घालावी तुला साद
____________
लक्ष्मण शिर्के

वाटत होते मनापासून

वाटत होते मनापासून खूप
तू पण माझ्यावर प्रेम करायाचिस
कातरवेळी खूपच खिन्न होऊन
कधी कधी माझ ह्रदय चोरायचिस
____________
लक्ष्मण शिर्के

त्याच गुलाबाच्या फुलाने

त्याच गुलाबाच्या फुलाने
मला आज आठवण करून दिली
विसरलास काय त्या आनाभाका
आणि पुन्हा मनाची उलघाल झाली
____________
लक्ष्मण शिर्के

पण जेव्हा फसलो

नाही कुठेतरी चुकलोय मी
चाललो होतो एकटा
पण जेव्हा फसलो क्षुल्लक गोष्टीत
तेव्हा आठवल्या आधाराच्या वाटा
____________
लक्ष्मण शिर्के

स्वस्थ आता बसणार नाही

बस बोललिस हाच आधार आहे मला आकाशाएवढा
मुळिच स्वस्थ आता बसणार नाही
शब्दांचाच आधार खूप मोठा असतो कुणालाही
कुठल्याहि परिस्थितीत फसणार नाही
____________
लक्ष्मण शिर्के

ती दुर्मिळ पाने

ती दुर्मिळ पाने आहेत
मी ठेवलय त्यांना साठवुन
आठवण झाल्यावर उघडुन पाहतो
भूतकाळ येतो मग आठवुन
____________
लक्ष्मण शिर्के

मी उठायला जातोय

मी उठायला जातोय पण
दिसताय हे भळभळनारे रक्त
मळमळुन येतय ध्येय गाठायचेय मला
पण बनतोय मी दिवसेंदिवस अशक्त
____________
लक्ष्मण शिर्के

त्याच काट्यातुन चालताना

त्याच काट्यातुन चालताना
पाय रक्तबम्बाळ झाले
प्रेमाने जवळ आलेले मित्र पण
त्यावेळी दूर झाले
____________
लक्ष्मण शिर्के

नजरेचा धाक मला

नजरेचा धाक मला
त्या वेळेसच वाटला
तिच्या प्रीतीच्या हाकेचा आवाज
नजरेत माझ्या साठला
____________
लक्ष्मण शिर्के

नजरेची झलक

त्या पापण्या झुकताना पण
तू शेवटची दिलीस नजरेची झलक
मनात धस्स झाले अबोल शब्द झाले
अंतरी मन तळमळले ऐकूनी ती हाक
____________
लक्ष्मण शिर्के

जरा लाजून

मूक नयनांची साद मिळायला
जरा लाजून तर वर बघ
कशाला नेहमीसारखाच खाली पाहून
अशी तू लाजतेस मग
____________
लक्ष्मण शिर्के

आठवली चंद्रकोर

तुझे नयन पाहुनी मज
आठवली चंद्रकोर
लव लव ती गोड वाटली
पाहिले मी बनुनी चोर
____________
लक्ष्मण शिर्के

खवळणार्‍या समुद्रालासुद्धा

त्या खवळणार्‍या समुद्रालासुद्धा
किती तरी वेळा मी समजाविले
एकच लाट आली कुठुनशी
माझ्या संपूर्ण स्वप्नालाच बुजविले
____________
लक्ष्मण शिर्के

शब्दांची संगत करतो

आपण शब्दांची संगत करतो
शब्द पण आपली करतात
कारण तेच असतात आपले पाठीराखे
आपल्यासारखे शब्दांसाठीच झुरतात
____________
लक्ष्मण शिर्के

तुझे ते समीकरण

तुझे ते समीकरण
जगण्याला पर्याय झाले
मी मरताना त्याच सूत्रात गेलो
पुन्हा जगणे जवळ आले
____________
लक्ष्मण शिर्के

ओढ अशी तुझी

ओढ अशी तुझी पण
माझ्या मनी खेळत आहे
माहीत नाही तुझ्या मनात
माझ्याविषयी काय घोळत आहे
____________
लक्ष्मण शिर्के

त्या शीतल चांदण्यातही

त्या शीतल चांदण्यातही
भासवितात त्या आठवणी
लाटानवर आदळनार्या लाटातही
तूच दिसतेस मनोमनी
____________
लक्ष्मण शिर्के

मला डोक्यावर घेणारा पण

होय त्याच परिस्थितीचा अनुभव
आज माझ्या अंगी लागला
काल पर्यंत मला डोक्यावर घेणारा पण
माझ्यापासून दूर जाऊ भागला
____________
लक्ष्मण शिर्के

पाय ओढन्यातच

कष्टही आपलेच लोक करतात
आणि विसरही आपल्याच लोकांना होतो
एक दुसर्‍याचे पाय ओढन्यातच
रोजचा दिवस वाया जातो
____________
लक्ष्मण शिर्के

वाटले मला त्या जखमांवर

वाटले मला त्या जखमांवर
फुंकर जरा मारावी
आणि त्यापासून मिळणार्‍या आनंदाची
आस मनापासून धरावी
____________
लक्ष्मण शिर्के

भावनेशिच खेळ खेळुन

त्या भावनेशिच खेळ खेळुन
मन झाले माझे खिन्न
कधी कधी जीव कोमेजतो
न सुचताच नजरेत पाहते शुन्य
____________
लक्ष्मण शिर्के

आपल्यारख्या सर्वसामान्याचे

नशीब नेहमीच असे असते
आपल्यारख्या सर्वसामान्याचे
गरिबांना मिळते थोडेच
बाकी सर्व असते श्रीमंतांचे
____________
लक्ष्मण शिर्के

जेव्हा पासून मी

जेव्हा पासून मी माझ्या
अश्रूंनाच सुख मानू लागलो
बंध त्या मैत्रीचे तेव्हा
जवळ जाऊन जानु लागलो
____________
लक्ष्मण शिर्के

माझाच मी राहतो

सुखामागून दुख दुखामागून सुख
कधी संपणार ही आपली भूक
हा दुनियेचा लपाछपिचा खेळ पाहून
माझाच मी राहतो आपला मूक
____________
लक्ष्मण शिर्के

एकमेकांची मने पोसतो

अनुभव हा नेहमीच
सर्वांच्या पाठीशी असतो
म्हणून तर तुम्ही आम्ही
एकमेकांची मने पोसतो
____________
लक्ष्मण शिर्के

दुनिया

आपण नेहमीच आपले म्हणतो
पण ते नसतच मुळी
दुनिया फक्त पळत्याच्या पाठी लागते
शहानी असून बनते खुळी
____________
लक्ष्मण शिर्के

9.24.2009

माझ्या जीवनातले दुख

माझ्या जीवनातले दुख
गमतीतच मी जाणतो
अश्रू येऊनही हसण्यासाठी
विनोदात त्यांना आणतो
____________
लक्ष्मण शिर्के

कशी होईल नशिबावार मात

कितीही प्रयत्न केला तरी
मनातले विचार नाहीत जात
नको कुरवाळत बसू या जखमान्ना
कशी होईल नशिबावार मात
____________
लक्ष्मण शिर्के

सुख तर राहिलच बाजूला

विचार केला खूप सुख मिळेल तेथे
दुखाचा डोंगर उभा राहिला
सुख तर राहिलच बाजूला
सोसाट्याचाच वारा मी पाहिला
____________
लक्ष्मण शिर्के

मरता मरता पण

सुखाची साथ मिळाली त्याला
दुखच दिसल नाही
म्हणून तर आता मरता मरता पण
कुणाचा आधार पण सोसला नाही
____________
लक्ष्मण शिर्के

आधार हा शब्दच

आधार हा शब्दच मी
मनातून काढला होता
कारण माझ्यापासून तो
कित्येक दिवस दुरावला होता
____________
लक्ष्मण शिर्के

कुणासाठी तरी

कुणासाठी तरी झुरताना
नेहमीच मी घाबरतो
आणि मग तिच्या समोर नसण्यातच
माझ्या मनाला सावरतो
____________
लक्ष्मण शिर्के

पळून तरी काय करणार

पळून तरी काय करणार
निमित्त तर हवय
जगतोय आपण आपल्यासाठी
सार त्यातच संपत वय
____________
लक्ष्मण शिर्के

दुनियाच असते अशी

ही दुनियाच असते अशी
एकमेकांना छळते
आणि कधी कधी येकत्र येऊन
एकमेकांसाठी पळते
____________
लक्ष्मण शिर्के

जगापुढे पण झुकाव लागतय

जगतोय मी आयुष्य आनंदात
सुख दुख सोसाव लागतय
पण कधी कधी मला
जगापुढे पण झुकाव लागतय
____________
लक्ष्मण शिर्के

सुख नेहमीच असत

याच जखमा जेव्हा भरून येतात
तेव्हा आपले हात त्यावर आपोआप फिरती
आणि हळूच आपणच आपल्याला बोलतो
सुख नेहमीच असत दुख सरल्यावरति
___________
लक्ष्मण शिर्के

9.18.2009

जीवनाचा हा मुलमन्त्र

जीवनाचा हा मुलमन्त्र
घेतला मी समजून
नाते टिकवून ठेवलेय
मी शत्रून्शिही गोडीने उमजून
___________
लक्ष्मण शिर्के

भावना तोलल्या जातात

भावना तोलल्या जातात
कारण त्यात असते संस्कृती
त्यातूनच तर बनते
नात्यातील गुंतागुंतीची नाजूक आकृती
______________
लक्ष्मण शिर्के

दोषी आहे मी...

मुकेपणा हा तुझा
ओळखलाच नाही मी
रागावत नाही तुझ्यावर
यात दोषी आहे मी...
____________
लक्ष्मण शिर्के

त्या प्रेमाच्या गावाला

त्या प्रेमाच्या गावाला
मी नेहमीच जात असतो
आणि काही क्षणांचा का होईना
आस्वाद नेहमीच घेत असतो
___________
लक्ष्मण शिर्के

मी कुठे म्हणालो होतो

हो तू त्यावेळी बोललिस होतीस
तुझीच आहे तुझीच राहीन
अग पण मी कुठे म्हणालो होतो
तुझी मी नेहमीच वाट पाहिन
____________
लक्ष्मण शिर्के

शेवटचीच संधी

शेवटचीच संधी आहे तुला
प्रेमाला साद माझ्या देशील का
काही क्षणांचाच अवधी असेल
माझे मन विचारात घेशिल का
_____________
लक्ष्मण शिर्के

घालावी साद

हलकेच येते कधी मनी
घालावी साद दुरून तिला
आणि नकळत तिने पण
प्रेमाची चाहूल द्यावी मला
___________
लक्ष्मण शिर्के

क्षणातच ओळखलेस

मन हे माझे तू
अलगदपणे पारखलेस
आणि माझ्या भावनांना
काही क्षणातच ओळखलेस
_____________
लक्ष्मण शिर्के

मुकया डोळ्यांनीच पाहिले

हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले
__________
लक्ष्मण शिर्के

मूक शब्दांनी गिरविले

समुद्रातील उसाळणार्‍या लाटांना
लाटांनीच हळुवारपणे सावरले
मनातील माझ्या भावनांना
मूक शब्दांनी गिरविले....
____________
लक्ष्मण शिर्के

बाप्पा च्या आगमनाने

गणपती बाप्पा च्या आगमनाने
मन आनंदात नाचत हसले
तेच मन काल जाताना खिन्न भावनेने
नयनी अश्रू दाटून हिरमुसले...
___________
लक्ष्मण शिर्के

यापुढे चालू राहील

जीवनाचे गीत माझे
असेच यापुढे चालू राहील
साद नाही कुणी दिली तरी
अपेक्षा अशीच करत राहील....
___________
लक्ष्मण शिर्के

मन माझे आतुरते

तुमच्या या मैत्रीत नेहमीच
मन माझे आतुरते
रात्री तुटणार्‍या चांदण्याप्रमाणे
पृथ्वीवर येऊन उतरते
____________
लक्ष्मण शिर्के

9.17.2009

वाट पाहतेय रे तुझी.. (कविता)

वाट पाहतेय रे तुझी.. तिचे ते शेवटचे शब्द..
न बोलताच मूकपणे फोन ठेवला त्याने
आगतिक झाला होता खूप स्वप्नवेड्या धुंदीत
वर्ष उलटून गेले तरी जात होता तिच्याजवळ मनाने

आनंद झालेला खूप त्याला
ती आता त्याला भेटनार होती त्याच नदीच्या काठावर
तहान भूक सुद्धा विसरला होता तिच्यासाठी
आता त्याचे लक्ष लागून होते गाडीच्या वाटेवर

नुकतीच परीक्षा संपली होती त्याची
पोरग आपल लांब शिकायला गेलय
उद्या तो येणार म्हणून आनंदी वातावरण झालेल
उत्साहाला खूपच उधाण त्यांच्या आलय

सामानाची सगळी आवारा आवर करताना
हुन्दका अनावर होत होता
कारण आतापर्यंतची ही भाड्याचि रूम
तो काही क्षणातच सोडनार होता

एस टी ने आल्याचा कर्कश आवाज दिला
याला खूपच गहीवरुन आले होते....
शेजारींच्या गाठी घेता घेता
अश्रू अलगदपणे गालावरून ओघळत होते

एकदाचे त्याने सामान उचलले
मागे त्याने पाहिलेच नाही
वर्षभर या मातीत खेळत होता
येथे आता कुठले अस्तित्वच राहीले नाही


रात्रीच्या त्या वळणावळणाच्या प्रवासात
त्याचा डोळाच लागत नव्हता
खिडकीच्या बाहेर मिट्ठ काळोखात
सारखा तीचाच भास होत होता

एकदाची ती जीवघेणी रस्ता संपली
क्षणोक्षणि आतुर झालेला तिला भेटायला
कधी एकदाचा भेटतोय त्याला झालेल
भूतकाळ लागले मनात त्याच्या साठायला

लगबगीण घरी गेले पोरगे
सामानाच्या पिशव्या ठेवून लगेच येतो म्हटले
पोरगा पाहिल्याच्या समाधानानेच
आई बापाला हायसे वाटले

तिला पाहण्याच्या कल्पनेनेच
त्याचे अंग शहारले होते
इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर
त्याचे सर्वांग मोहरले होते

घरासमोर जाताच तो थबकला
जागच्या जागीच गळून गेला
तिच्या घरच्यांचा आरडा ओरडा ऐकून
काहीतरी विपरीत घडलय ते समजला

तरिपन स्वताला सावरून त्याने शेजारच्यांना विचारले
भानावर येऊन शरीराला सावरले त्याने
अरे ती कन्टाळली रे घरच्यांच्या त्रासाला
काल रात्री नदीच्या पात्रात जीवन संपविले तिने

काही वेळ कळलेच नाही त्याला कुठे आहे आपण
अधाशासारखा नदीच्या काठाकडे पळत सुटला
किनारा गाठताच ज्या दगडावर बसून ते तासन्तास बसायचे
त्याकडे नीर्विकारपणे पाहत त्याच्या अश्रूंचा पुरच आटला

दगडीजवळ जाऊन त्याने त्याखालच्या कपारीत हात घातला
जिथे ते एकमेकांना भेटवस्तू आणि प्रेमपत्रे ठेवायचे
आजही त्याला बिलगल काहीतरी तसच
क्षणार्धात तो उतावीळ झाला ते वाचायचे

त्यात लिहिल होत... तू म्हनशिल एक रात्र
तुला थांबविले नाही माझ्यासाठी
पण माफ कर मला रात्र रात्र
जागून काढल्या मी तुझ्यासाठी

पण आज मात्र अतीच झाल
मी जानल नशिबात संसार नाही आपणा एकमेकांचा
काय उपयोग त्या जगण्याला तरी
म्हणून तर निर्णय घेतला मी हा टोकाचा

आता मात्र तो मनापासून खळखळुन हसला
जीवनात आता रामच नाही
ती मला न विचारताच निघून गेली
माझही आता इथे काम नाही

त्याच्या कानात शब्द घुमू लागले.. मी वाट पाहतेय रे तुझी
मन हुरळुन गेल त्याच चेहृयावर टवटवी आली
कठड्यावर चढला नदीच्या आणि सर्वांग झोकून दिले प्रवाहात
अग वाट काय पाहतेस... मी आलोय बघ... स्वताच्या अस्तित्वाचीपण राखरांगोळी केली......
___________
लक्ष्मण शिर्के

मुंबई नगरी (कविता)

मुंबई नगरीची किमया भारी
चोवीस तास चालते सारी
पुरूष असो वा तेथे नारी
सर्वांचीच असते नेहमीची वारी

पहाट झालेली काळत नाही
वर्दळ व्हायला सुरूवात होते
सूर्य उदयाच्या आत मध्येच
रस्ता दुतर्फा भरून वाहते

गरीब असो वा श्रीमंत
भेदभाव ही करतच नाही
कुणाचे येथे काही होऊ द्या
कुणालाच येथे गय नाही

दुधावाला पाववाला सकाळी सकाळी
घरोघरी जाऊन देतात आरोळी
कितीतरी जन या वेळी
नुसतीच पडून मारतात लोळी

सकाळपासून ते सन्ध्याकाळपर्यन्त
या नगरीत कस सुरळीत चालत
जशी गरज लागेल तशी
कुणीही कुणासही मदतीस बोलत

यंत्र गिरण्या तसेच कापड गिरण्यांचा
हल्ली र्‍हास होत आहे
जून ते सोने म्हणाणार्‍या संस्कृतीचा
नुसताच भास होत आहे

अशी ही मुंबई नगरी
कुठल्याही प्राप्त परिस्थितीशी तरतूद करते
कुणीही कसेही नियम लादले
आनंदाने त्याचा स्वीकार करते

पहाटे पासूनच चालू होते
बारा डब्यांची लोकल गाडी
पहिल्या पाळीला असणारे कर्मचारी
वेळ नियमांचा जपच पाडी

बॉस पासून प्युन पर्यंत
सर्वांना मुंबई आवडते खूप
पण हल्ली या मुंबईच
बर्‍याच गोष्टींनी बदललय रूप....

___________
लक्ष्मण शिर्के

तिच्यासाठी इतका झुरेन

वाटल नव्हते मला मी
तिच्यासाठी इतका झुरेन
तिचा निर्णय मिळेपर्यन्त
तिच्याच स्वप्नात मरेन
___________
लक्ष्मण शिर्के

हो म्हन नाहीतर

हो म्हन नाहीतर नाही म्हन
मी वाट पाहतच राहीन
शेवटच्या श्वासापर्यन्त माझ्या
तुझेच गीत गात राहीन
___________
लक्ष्मण शिर्के

पोळलेल्या वाटसरुला

का ग तू करते स माझ्यावर
इतकि जीवापाड माया
जशी पोळलेल्या वाटसरुला
मिळते वृक्षाची छाया
___________
लक्ष्मण शिर्के

तो हळवा खूप आहे

तू रागाऊ नकोस त्याच्यावर
तो हळवा खूप आहे
उगीच मन दुखी होते त्याचे
तरिपन तुझाच त्याला हुरूप आहे
___________
लक्ष्मण शिर्के

कंबरड्यात लाथ

तुला दोन पाय आणि दोन हात
आहेत तुझ्या ते साथ
जर का कुणी केली मस्करी बात
घाल अशी त्याच्या कंबरड्यात लाथ
___________
लक्ष्मण शिर्के

आपले हे नाते

अग अस किती दिवस नुसते
म्हणत मला राहशील
आणि आपले हे नाते
समोर न येताच निभावशिल
___________
लक्ष्मण शिर्के

त्याचीच वाट धरून

प्रेम ही बातच न्यारी असते
दोघात असतो एक विश्वास
त्याचीच वाट धरून ते
भविष्याची बघतात आस
___________
लक्ष्मण शिर्के

वचन त्याचे मोडु नकोस

कितीही छळुदे तुझे मन तुला
साथ त्याची सोडु नकोस
असा मिळनार नाही पुन्हा
वचन त्याचे मोडु नकोस
___________
लक्ष्मण शिर्के

अर्थच काय असा उरला

वाट पाहताना प्रतिसाद नाही
उत्तर विचार याचे त्याला
नंतर दिलेल्या प्रतिसादाला
अर्थच काय असा उरला
___________
लक्ष्मण शिर्के

वाटले नव्हते

वाटले नव्हते तो इतका
तुझ्यावर निष्ठुर होईल
दिल्या घेतलेल्या शपथान्चे
अश्रूनवाटे सार्थक होऊन जाईल
___________
लक्ष्मण शिर्के

तू त्याचा अर्थ

तुझा प्रश्न त्याने नेहमीच
त्याच्या नजरेआड केला
आणि तू त्याचा अर्थ
भांडनाच्या अर्थात लावला
___________
लक्ष्मण शिर्के

हे नेहमीचाच असत

आपल आहे ते आपल्याला दिसत नाही
कारण ते माणसाच्या नियतीतच असत
आणि ते दुरावल्यावर खंत दाटून येते
जीवनात अस हे नेहमीचाच असत
___________
लक्ष्मण शिर्के

कामाचा दर्जा

काम तर नेहमीच असते
आपण त्याला तर जीवन मानतो
बॉस त्यातूनच तर आपल्या
कामाचा दर्जा किती आहे ते जाणतो
___________
लक्ष्मण शिर्के

संकल्प सत्यात उतरले

कल्पना करायला गेलो
संकल्प सत्यात उतरले
दुखाचे दिवस जाऊन
सुखात जीवन मन्तरले
___________
लक्ष्मण शिर्के

कवीच्या भावना

अस म्हटल जात की
कवीच्या भावना कविलाच समजतात
शब्द शब्दात गुरफटून
कवी मनाचे बोल उमजतात
___________
लक्ष्मण शिर्के

तू संयम सोडू नकोस

कितीही मनाला छळल तुझ्या
तरी तू संयम सोडू नकोस
आलेल्या सन्कटान्शी सामना कर
त्याला भरकटुन देऊ नकोस
___________
लक्ष्मण शिर्के

कवितेची चारोळी जुळवत

अहो इथे कविता वाचायला
कुणी वेळच नाही मिळवत
म्हणून मी नेहमीच बसतो
कवितेची चारोळी जुळवत
___________
लक्ष्मण शिर्के

आयुष्य उरले होते

बघता बघता त्यालाही
क्रूर मृत्यूने कवटाळले होते
पण त्याचही काही चालल नाही
अजुन आयुष्य उरले होते
___________
लक्ष्मण शिर्के

समाजाला तोलतोच

बोलणार्यांचे लोंढे कधीच बंद होत नसतात
तोंड असेल तर तो बोलतोच
लोकशाही आहे ही राजे आता राजेशाही नाही
अधिकारांच्या वापरात तो समाजाला तोलतोच
___________
लक्ष्मण शिर्के

कधीकधी होते अस्त्र

राजे इतकी पण कट्तरता नकोय
शब्द हे कधीकधी होते अस्त्र
वेळ आल्यास युद्धाच्या वेळी
मागे टाकते भले भले अण्वस्त्र
___________
लक्ष्मण शिर्के

शब्द ते शब्द असतात

अन्याय कितीही झाला तरी
शब्द ते शब्द असतात
ते कधीही कुणावरही
भावनेच्या पलीकडे रागावात नसतात
___________
लक्ष्मण शिर्के

तूच दिला होतास

मला माहीत आहे
कसा होतो अन्याय
ज्यावेळी माझ्यावर झाला होता
तूच दिला होतास मला न्याय
___________
लक्ष्मण शिर्के

मुळीच नाही पाहणार

खूप पाहिलय वेड्या आशेने मागे
आता मुळीच नाही पाहणार
भविष्याची शिदोरी आनंदाने सोडत
डोळ्यात अश्रू आता नाही वाहणार
___________
लक्ष्मण शिर्के

हळव्या मनाची साथ

इतकी माझी अपेक्षा नाही ग
नको मला फुलांची बरसात
फक्त हवी आहे मला छोट्या
माझ्या सारख्याच हळव्या मनाची साथ
___________
लक्ष्मण शिर्के

व्हायचे तेच होते

मनाशी कितीही ठरविले
तरी व्हायचे तेच होते
म्हणून माझे मन
नेहमीच चालू वर्तमान काळालाच मानते
___________
लक्ष्मण शिर्के

मोडक्या तुटक्या शब्दात

मन जानल शब्द जानल
भावनासुद्धा जाणल्या
कसल्यातरी मोडक्या तुटक्या शब्दात
त्या कवितेत आणल्या
___________
लक्ष्मण शिर्के

प्रित अशीच राहो

तुझी प्रित अशीच राहो
एवढीच माझी इच्छा आहे
आणि तुझ्या सुखी जीवनास
माझ्याकडून सदिच्छा आहे
___________
लक्ष्मण शिर्के

तू असशिल पणती

तू असशिल पणती
तर मी आहे दिवा
नेहमीच आपण तेवत राहू
असाच आपला प्रवास हवा
___________
लक्ष्मण शिर्के

वाट चुकू नकोस

अशी वाट चुकू नकोस
वळण हे धोक्याचे असते
पुढे असते नवे गाव
ओळखीचे नसल्यामुळे मन फसते
___________
लक्ष्मण शिर्के

सरळ असलेल्या समाजाबरोबर

म्हणून तर नेहमीच मी
वाकड्या वळनावरही सरळ असतो
आणि हल्ली सरळ असलेल्या समाजाबरोबर
संस्कृतीचे भान ठेवत असतो
___________
लक्ष्मण शिर्के

का कळू नये तिला

इतक का कळू नये तिला की
अश्रूंचीसुद्धा सोबत सोडावी
मला भावनेच्या जाळ्यात ओढून
असलेली जिद्द पण मोडावी
___________
लक्ष्मण शिर्के

त्यावेळीच कळले

मोह हा इतका वाईट असतो
मला त्यावेळीच कळले
सगळीकडचे चित्त जाऊन
मन वाईट प्रवृत्तींकडे वळले
___________
लक्ष्मण शिर्के

म्या दरिद्री पामर

म्या दरिद्री पामर
नव्हती मला तिच्याकडून अपेक्षा
कृतज्ञतेची फुले नेहमीच पुढे करून
शेवटी तिने केली माझीच उपेक्षा
___________
लक्ष्मण शिर्के

हे घडणारच होत

हे घडणारच होत ना कधीतरी
अगोदरच सांगायाच होत ना मला
आधीच काळजाला लावून घेतलस
आता कसा मी समजावनार तुला
___________
लक्ष्मण शिर्के

तोंड लपवून का पळतेस

रडनार नाही रडनार नाही
म्हणून तोंड लपवून का पळतेस
स्वताचिच लाज वाटते म्हणून
लपून अश्रू का गाळतेस
___________
लक्ष्मण शिर्के

आपल आपल्याला सोडून जात

जेव्हा आपल आपल्याला सोडून जात
फक्त उरतात त्याच्या आठवणी
कधी कधी मनास उन्मळुन येऊन
डोळ्यात अश्रूनवाटे तरळत पाणी
___________
लक्ष्मण शिर्के

अशी लाज सोडू नको

अशी लाज सोडू नको
मन कर तुझे खंबीर
अश्रूंची व्यथा माहीत आहे मला
स्वताला दे जरा धीर
___________
लक्ष्मण शिर्के

मी नुसताच मरत होतो

मी समजलो तिला माझी
पण ती नव्हतीच मुळी
मी नुसताच मरत होतो
ऐकतच नव्हती ही भावना खुळी
___________
लक्ष्मण शिर्के

येणार्‍या प्रत्येक प्रसंगाला

येणार्‍या प्रत्येक प्रसंगाला
तोंड देण्याची माझी तयारी होती
पण बर झाल चागल झाल
कारण खर तर ती माझी कुनीच नव्हती
___________
लक्ष्मण शिर्के

तू जानली नाहीस

तेवढीच अपेक्षा होती माझी
पण ती पण तू जानली नाहीस
माझ्या कुठल्याच शब्दात
तुझी भावना आणली नाहीस
___________
लक्ष्मण शिर्के

असाच संघर्ष चालुद्या

असाच संघर्ष चालुद्या जीवनात
हा असतो उन सावलीचा खेळ
नशिबात आलेले जीवन जगत
बसवा सुख दुखाचा मेळ
___________
लक्ष्मण शिर्के

सुख दुखाचा हा गुंता

सुख दुखाचा हा गुंता
प्रत्येकाच्याच नशिबी असतो
यात कधी कधी कोण हसतो
तर कोण कधी रडत बसतो
___________
लक्ष्मण शिर्के

भूतकाळातील आठवणींच जाळ

जेव्हा भूतकाळातील आठवणींच जाळ
माझ्या अवती भवती साचले
मन माझ वेड पाखरू
त्यात मनसोकतपणे डुम्बले
___________
लक्ष्मण शिर्के

अंतिम ध्येय गाठायला

नजरेत पाहिले की समजले
कुठपर्यन्त तू धावशिल
अंतिम ध्येय गाठायला तू
किती वेगाने पळशिल
___________
लक्ष्मण शिर्के

समाजात कुठे मिळताय

काय झाले माझे मलाच कळेना
नेहमीच कुठेही भटकतोय
अन्न, वस्त्र निवारा या गरजा
समाजात कुठे मिळताय का बघतोय
___________
लक्ष्मण शिर्के

अजुन एक संधी

चुक झाली असेल आमच्याकडून
पदरात पाडून घ्या
मुखातून शब्द बाहेर पडले
अजुन एक संधी मला द्या
___________
लक्ष्मण शिर्के

नियतीत काय कुणाच्या

नियतीत काय कुणाच्या
कधीच सापडत नाही
म्हणून तर म्रुगजळाच्या मागे
मनुष्य नेहमीच धावत राही
___________
लक्ष्मण शिर्के

मुळीच राहणार नाही

मी जरी आता झालो असेन
झाडाच एक सुकलेल पान
दुख सोसेन आकाशाएवढे
पण मुळीच राहणार नाही कुनापूढे गहाण
___________
लक्ष्मण शिर्के

हरायलाच आवडते

हल्ली मला जिंकण्यापेक्षा
हरायलाच आवडते
म्हणून तर छोटे मन माझे
मोठ्या मनालाच निवडते
___________
लक्ष्मण शिर्के

जोराच्या पावसात

शिशीराच्या जोराच्या पावसात
अश्रू माझे ओघळले
कुणालाच कळले नाही
कारण ते पावसातच मिसळले
___________
लक्ष्मण शिर्के

माझे डोळेपन पानावले

कळीच्या खुलन्याने एक
फुलपाखरू जवळ आले
त्यांचे गोड नाते पाहून
माझे डोळेपन पानावले
___________
लक्ष्मण शिर्के

असे कसे झाले

असे कसे झाले सांग
तुझे एवढे कठोर मन
हरवलेस काय आठवणितले
तुझे माझे मुके क्षण
___________
लक्ष्मण शिर्के

सांगायाच होत तरी मला

निदान सांगायाच होत तरी मला
तुला मी विचारलच नसत
तुझ्या अंतरीच दुख अशात मी
मुळीच वाढवील नसत
___________
लक्ष्मण शिर्के

शब्दांची गरज होती

मुकया भावना होत्या माझ्या
तेव्हा शब्दांची गरज होती
दुनियेत गेलो होतो शब्दांच्या
कारण शब्दच बनले होते मोती
___________
लक्ष्मण शिर्के

तिने वाचला होता

तिने वाचला होता माझ्यासमोर
जीवनाचा संपूर्ण कित्ता
तरिपन माझ्या मनातल्या समुद्राला
त्याचा थान्गपत्ताच नव्हता
___________
लक्ष्मण शिर्के

मुके क्षण

आठव त्या पावसाच्या सरीमध्ये
तू माझ्याबरोबर घालविलेले मुके क्षण
कल्पना करतोय नुसती आता
कारण रमतच नाही त्याशिवाय मन
___________
लक्ष्मण शिर्के

मावळनारा सूर्य

मावळनारा सूर्य जेव्हा मी
कधी असा पाहतो
माझेही कटू मन होऊन मी
परतिच्या दुनियेत जातो
___________
लक्ष्मण शिर्के

तेव्हा मी जाणले

आकाशातील इंद्रधनुष्य मी पाहिले
दिसल्या सप्तरंगाच्या बिकट छटा
आणि तेव्हा मी जाणले की
आपण का चुकतो आपल्या वाटा
___________
लक्ष्मण शिर्के

किमान दुनियेलातरी

प्रेम मिळो अगर न मिळो
माझे मन नेहमीच धावते
किमान दुनियेलातरी माझे
निस्सीम असलेले प्रेम कळते
___________
लक्ष्मण शिर्के

मनातून पुरता खचलो

सर्वात पुढे क्षितिजावर जाऊन
जेव्हा मी पोहोचलो
बरोबर कुणीच नव्हते बघून
मनातून पुरता खचलो
___________
लक्ष्मण शिर्के

मी असाच बोलतोय

त्या झुरन्यात पण मजा आहे
त्या जगण्यात पण मजा आहे
अहो मजा कुठली आहे मी असाच बोलतोय
ही तर मला मिळालेली एक सजा आहे
___________
लक्ष्मण शिर्के

सोबत कुणीच नसाव

सोबत कुणीच नसाव
असाच मला मनापासून वाटत
कारण आपण नेहमीच आपले बघतो
समोरच्याचे काळीज अशाने तुटते
___________
लक्ष्मण शिर्के

भावनेच्या भरात

भावनेच्या भरात खूपच हसलो
तिच्यासाठी कल्पना साठवत बसलो
आणि घरी जाऊन ओथम्बलेल्या भावना
मनी आठवून अश्रू ढाळत बसलो
___________
लक्ष्मण शिर्के

सुखी जीवनासाठी सावरून

आता मी पण घेईन
जे आहे ते माझे आवरून
मनाचा पसारा खूपच वाढलाय
माझ्या पुढील सुखी जीवनासाठी सावरून
___________
लक्ष्मण शिर्के

तुला फक्त दिसेल

एवढासा आधीच मी
त्यात विचारतोस मला जीवनाचा अर्थ
अर्थ सांगायचा तर लांबच राहील
तुला फक्त दिसेल माझा यात स्वार्थ
___________
लक्ष्मण शिर्के

स्वप्नात तुला हेरतो

तुझ्या मोहक छायेने
मोरपिसारा अंगावर फिरतो
माझाच मला स्पर्श मग
स्वप्नात तुला हेरतो
___________
लक्ष्मण शिर्के

पहिला स्पर्श

तुझा तो पहिला स्पर्श
आजही मला आठवितो
ते दुर्मिळ रोमांचीत क्षण
आजही मनात साठवितो
___________
लक्ष्मण शिर्के

अस का ग

अस का ग तुझ वेडे
नेहमीच होत रहात
माझ्या जवळ आल्यावर
तुझ्या मनातल निघून जात
___________
लक्ष्मण शिर्के

पक्ष वाढविन्यातच माझे कर्म

कट्टर मराठा आहे मी
माणसे फोडने हा माझा धर्म आहे
आणि तुझी चांगली संगत लाभली तर
पक्ष वाढविन्यातच माझे कर्म आहे
___________
लक्ष्मण शिर्के

ओळख तुझी सांगूच नकोस

हो कुणीतरी म्हटलच आहे
नावात काय आहे
अरे ओळख तुझी सांगूच नकोस
असाच तू चांगला आहे
___________
लक्ष्मण शिर्के

समोरच्याचे हाल होतात

पिऊन आलेल्याला बोलून द्यायाच असत
नाहीतर डोळे त्याचे लाल होतात
आणि मग तोन्डाचा पट्टा हवा तसा वळुन
समोरच्याचे हाल होतात
___________
लक्ष्मण शिर्के

शेवटचा झटका

आटा करा नाहीतर पिटा करा
पण मटका सोडु नका
आज नंबर लागलाच पाहिजे
शेवटचा झटका सोडु नका
___________
लक्ष्मण शिर्के

मनच नाही मला

मनच नाही मला आता
उराशि फक्त स्वप्न घेत आहे
वार्याची एक झुळुक सुद्धा
मोरपिसासारखी मला साथ देत आहे
___________
लक्ष्मण शिर्के

डोळ्यात अश्रू साठवितात

त्या जागलेल्या रात्री
अजुन मला आठवितात
आज त्याच आठवणी
माझ्या डोळ्यात अश्रू साठवितात
___________
लक्ष्मण शिर्के

चांगले घडावे आपल्या हातून

होय संवादातूनच होते कविता
आपणही शिकतो त्यातून
तुझे शब्द मला माझे शब्द तुला
नेहमीच चांगले घडावे आपल्या हातून
___________
लक्ष्मण शिर्के

सुख नेहमीच असत

याच जखमा जेव्हा भरून येतात
तेव्हा आपले हात त्यावर आपोआप फिरती
आणि हळूच आपणच आपल्याला बोलतो
सुख नेहमीच असत दुख सरल्यावरति
___________
लक्ष्मण शिर्के

जगापुढे पण झुकाव लागतय

जगतोय मी आयुष्य आनंदात
सुख दुख सोसाव लागतय
पण कधी कधी मला
जगापुढे पण झुकाव लागतय
___________
लक्ष्मण शिर्के

ही दुनियाच असते

ही दुनियाच असते अशी
एकमेकांना छळते
आणि कधी कधी येकत्र येऊन
एकमेकांसाठी पळते
___________
लक्ष्मण शिर्के

तुझी माझ्याशी मैत्री

तुझी माझ्याशी मैत्री
अशीच राहू दे
एवढीच इछा आहे मनी
गंध तुला राहू दे.......!!!!!
___________
लक्ष्मण शिर्के

तुझ्याशी मन माझ

तुझ्याशी मन माझ
कस छान ग जुळत
आणि मला त्यातून मैत्रीच
नात काय आहे ते कळ्त......!!!!
___________
लक्ष्मण शिर्के

शब्द वाया जातात

निरर्थक बडबड करू नकोस
शब्द वाया जातात
आणि नंतर तेच शब्द पुन्हा
आपल्यावरच वादळ बनून येतात.....
___________
लक्ष्मण शिर्के

9.15.2009

नेहमीच सुखात साथी

मित्र माझे तुम्ही सर्व
नेहमीच सुखात साथी
तेवढ्याच सराईतपणे
दुख पण स्वीकारता हाती
___________
लक्ष्मण शिर्के

एकच शेवटची संधी

दुखावलेले मन माझे
कधी होईल आनंदी
फक्त तिला मागितली होती
एकच शेवटची संधी
__________
लक्ष्मण शिर्के

निघतो काट्याने पण काटा

माहीत नव्हत मला
दुखाला पण असतात वाटा
वेळ तशी आल्यास
निघतो काट्याने पण काटा
__________
लक्ष्मण शिर्के

दररोज मी जाऊन बसतो

त्या हिरवळीवर नेहमीच
दररोज मी जाऊन बसतो
आत्तापर्यंतच्या दुखी यातना
त्या गारव्यालाच सांगून बसतो
__________
लक्ष्मण शिर्के

शब्द असतात

हो तेच म्हटले होते तिला
शब्द असतात तलवारीच पात
तरीही ती तशीच बसली
नको असलेले गीत गात
__________
लक्ष्मण शिर्के

फसलास तू मला

फसलास तू मला
तरना इथे समजून
आता तरी व्यवस्थित घे
मी म्हातारा आहे इथे उमजून
__________
लक्ष्मण शिर्के

पाठीशी साथ

झेपायला गेल तर सगळ झेपत
अन्यायावर मात नेहमीच असते
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
पाठीशी साथ नेहमीच हवी असते
__________
लक्ष्मण शिर्के

इथे सुखाचा कुठे मेळ आहे

अरे आयुष्याच काय घेऊन बसलास
हा तर दररोजचा खेळ आहे
जिकडे तिकडे दुखच
इथे सुखाचा कुठे मेळ आहे
__________
लक्ष्मण शिर्के

जीवनच आहे माझे

जीवनच आहे माझे असे
काट्याकुट्यान्नि भरलेले
अर्धे आयुष्य असेच गेले
दुखाच्या बोजाखाली सरलेले
__________
लक्ष्मण शिर्के

पण तोंडच राहत नाही

नाही सांगत बाबा माझे दुख
पण तोंडच राहत नाही
महत्वाच्या वेळेला पण कधी कधी
हे साथच देत नाही
__________
लक्ष्मण शिर्के

ज़रूर मान्य करतो

ज़रूर मान्य करतो मी
शब्दान्च्या खेळित चुकलो
आणि भविष्यात होनारया मित्रा ला
क्षनार्धात असा का मुकलो
__________
लक्ष्मण शिर्के

ज़रूर मान्य करतो

ज़रूर मान्य करतो मी
शब्दान्च्या खेळित चुकलो
आणि भविष्यात होनारया मित्रा ला
क्षनार्धात असा का मुकलो
__________
लक्ष्मण शिर्के

सुखाचा राणमेवा

शब्दांच्या खेळित आपण
मन नेहमीच शुद्ध ठेवा
तरच मिळेल आपल्याला
येथे सुखाचा राणमेवा
__________
लक्ष्मण शिर्के

खूप होते पर्याय

खूप होते पर्याय पण
वेळेला एकही मिळाला नाही
कशाला एवढी खटाटोप केली
कशाला एवढी घाई
__________
लक्ष्मण शिर्के

उशिरा का होईना

अरे तू चातक आहेस
तिची नेहमीच वाट पाहतोस
ती येतेच नेहमी पर्जन्य थेंबाच्या रूपात
उशिरा का होईना पाणी पितोस
__________
लक्ष्मण शिर्के

चांदण्यात फिरताना

चांदण्यात फिरताना
मन माझे हबकले
तिला समोर पाहून
काही क्षनान्सठी थबकले
__________
लक्ष्मण शिर्के

आपला नंबर कधीच गेला

खूप तिची स्वप्न पाहिली
खूप विश्वास ठेवला
पण माहीत नव्हत मला की
आपला नंबर कधीच गेला
__________
लक्ष्मण शिर्के

मनात नाते उरते

अहो सुरुवातही तिनेच केली
आणि आता शेवटही तीच करते
तिच्या मनीचे कधीच गेले
पण आपल्या मनात नाते उरते
_____________
लक्ष्मण शिर्के

शेतकर्यांच्या या राज्यात

मला नको ठरवू उजवा
तू त्यालाच ठरव
पण शेतकर्यांच्या या राज्यात
त्याला बैल गाडीत मिरव
_____________
लक्ष्मण शिर्के

सरळ उत्तर तर द्या

काय राव लपून बसताय
सरळ भाषेत या
काही बोलाल ते मी सहन करेन
सरळ उत्तर तर द्या
_____________
लक्ष्मण शिर्के

चांगला गुरू कोण होता

हो हो जेवता उठता बसता झोपता
मी शब्दांचा फुकतो भाता
काय जन्मताच या गोष्टी शिकला नाही आपण
सांगा आपल्याला चांगला गुरू कोण होता
_____________
लक्ष्मण शिर्के

आपण शब्दांचे किमायागार

आपण शब्दांचे किमायागार
शब्दांना द्या आधार
नाहीतर रागावतील तुमच्यावर एक दिवस
मग राहाल तुम्ही नादार.......
_____________
लक्ष्मण शिर्के

शून्यात जाऊ नका

खरच तुम्ही मोठे असाल
तर इथे येऊ नका
आमच्याबरोबर तुमचिहि अब्रू घालवुन
शून्यात जाऊ नका
_____________
लक्ष्मण शिर्के

बेडकुळी तर बेडकुळी

बेडकुळी तर बेडकुळी
इथे कुणाचे काय जाते
आपल्यासारख्या पायखेच्यांमुळे
जग वाया जाते......
_____________
लक्ष्मण शिर्के

बघू संघर्ष कर

बघू संघर्ष कर मला तुझ्या भाषेत
मला तसला खूप आवडतो
आणि त्यातूनच मी माझा
निवडणुकीचा विरोधक निवडतो
_____________
लक्ष्मण शिर्के

आहे मला जान

मी जरी असलो लहान
शब्दांची आहे मला जान
पन कधी कधी चुकून
विसरुन जातो भान
_____________
लक्ष्मण शिर्के

गाळात अडकून फसलो

त्याच्यात आणि माझ्यात काय
तुलना करत बसलो
गरज नव्हती पण मन वेडे
पुरता गाळात अडकून फसलो
_____________
लक्ष्मण शिर्के

मलाच का वाटतय

ऐकून कोकिळेची कुहुकुहु
मन माझे झाले सुन्न
मोर पण धुंदीत नाचतोय त्याच्या
मलाच का वाटतय अस खिन्न
_____________
लक्ष्मण शिर्के

स्वप्नाला पूर्णविराम देईन

आज झोपल्यावर पुन्हा मी
त्याच माझ्या स्वप्नात जाईन
कालची बाकी पूर्ण करून
लवकरच स्वप्नाला पूर्णविराम देईन
_____________
लक्ष्मण शिर्के

कळी उमलल्याच स्वप्न

काल मी अर्धवट झोपेत
कळी उमलल्याच स्वप्न पाहील
सूर्याची किरने तोंडावर येऊन
तोडून घ्यायच बाकी राहील
_____________
लक्ष्मण शिर्के

उरल्यासुरल्या इच्छांनपण जाळतात

आपला पालकवर्ग आपणास
तळहाताच्या फोडाप्रमाने पाळतात
कर्तव्याचे तर सोडुनच द्या मुले
त्यांच्या उरल्यासुरल्या इच्छांनपण जाळतात
_____________
लक्ष्मण शिर्के

पुत्रप्रेमालाच मुकतात

आहो पोरांना काय बोलताय
हे आई बाप पन चुकतात
त्यान्ना डोक्यावर चढ़वीतात्त
मग पुत्रप्रेमालाच मुकतात
_____________
लक्ष्मण शिर्के

आजच्या पोरा बाळाना

आजच्या पोरा बाळाना
कितीही दया शिकवनुकिचे धड़े
नुसतच मठ बगत राहतील
मन बाहेर लक्ष तिसरीकडे
___________
लक्ष्मण शिर्के

एक वेडा रात्रभर

एक वेडा रात्रभर तिच्या आठवणीत
चंद्राच्या शीतल छायेकडे बघत बसला
चंद्रच म्हणाला मग उठ वेड्या
होता नव्हता तेवढा तू विश्वास गमावून बसला
_____________
लक्ष्मण शिर्के