वाट पाहतेय रे तुझी.. तिचे ते शेवटचे शब्द..
न बोलताच मूकपणे फोन ठेवला त्याने
आगतिक झाला होता खूप स्वप्नवेड्या धुंदीत
वर्ष उलटून गेले तरी जात होता तिच्याजवळ मनाने
आनंद झालेला खूप त्याला
ती आता त्याला भेटनार होती त्याच नदीच्या काठावर
तहान भूक सुद्धा विसरला होता तिच्यासाठी
आता त्याचे लक्ष लागून होते गाडीच्या वाटेवर
नुकतीच परीक्षा संपली होती त्याची
पोरग आपल लांब शिकायला गेलय
उद्या तो येणार म्हणून आनंदी वातावरण झालेल
उत्साहाला खूपच उधाण त्यांच्या आलय
सामानाची सगळी आवारा आवर करताना
हुन्दका अनावर होत होता
कारण आतापर्यंतची ही भाड्याचि रूम
तो काही क्षणातच सोडनार होता
एस टी ने आल्याचा कर्कश आवाज दिला
याला खूपच गहीवरुन आले होते....
शेजारींच्या गाठी घेता घेता
अश्रू अलगदपणे गालावरून ओघळत होते
एकदाचे त्याने सामान उचलले
मागे त्याने पाहिलेच नाही
वर्षभर या मातीत खेळत होता
येथे आता कुठले अस्तित्वच राहीले नाही
रात्रीच्या त्या वळणावळणाच्या प्रवासात
त्याचा डोळाच लागत नव्हता
खिडकीच्या बाहेर मिट्ठ काळोखात
सारखा तीचाच भास होत होता
एकदाची ती जीवघेणी रस्ता संपली
क्षणोक्षणि आतुर झालेला तिला भेटायला
कधी एकदाचा भेटतोय त्याला झालेल
भूतकाळ लागले मनात त्याच्या साठायला
लगबगीण घरी गेले पोरगे
सामानाच्या पिशव्या ठेवून लगेच येतो म्हटले
पोरगा पाहिल्याच्या समाधानानेच
आई बापाला हायसे वाटले
तिला पाहण्याच्या कल्पनेनेच
त्याचे अंग शहारले होते
इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर
त्याचे सर्वांग मोहरले होते
घरासमोर जाताच तो थबकला
जागच्या जागीच गळून गेला
तिच्या घरच्यांचा आरडा ओरडा ऐकून
काहीतरी विपरीत घडलय ते समजला
तरिपन स्वताला सावरून त्याने शेजारच्यांना विचारले
भानावर येऊन शरीराला सावरले त्याने
अरे ती कन्टाळली रे घरच्यांच्या त्रासाला
काल रात्री नदीच्या पात्रात जीवन संपविले तिने
काही वेळ कळलेच नाही त्याला कुठे आहे आपण
अधाशासारखा नदीच्या काठाकडे पळत सुटला
किनारा गाठताच ज्या दगडावर बसून ते तासन्तास बसायचे
त्याकडे नीर्विकारपणे पाहत त्याच्या अश्रूंचा पुरच आटला
दगडीजवळ जाऊन त्याने त्याखालच्या कपारीत हात घातला
जिथे ते एकमेकांना भेटवस्तू आणि प्रेमपत्रे ठेवायचे
आजही त्याला बिलगल काहीतरी तसच
क्षणार्धात तो उतावीळ झाला ते वाचायचे
त्यात लिहिल होत... तू म्हनशिल एक रात्र
तुला थांबविले नाही माझ्यासाठी
पण माफ कर मला रात्र रात्र
जागून काढल्या मी तुझ्यासाठी
पण आज मात्र अतीच झाल
मी जानल नशिबात संसार नाही आपणा एकमेकांचा
काय उपयोग त्या जगण्याला तरी
म्हणून तर निर्णय घेतला मी हा टोकाचा
आता मात्र तो मनापासून खळखळुन हसला
जीवनात आता रामच नाही
ती मला न विचारताच निघून गेली
माझही आता इथे काम नाही
त्याच्या कानात शब्द घुमू लागले.. मी वाट पाहतेय रे तुझी
मन हुरळुन गेल त्याच चेहृयावर टवटवी आली
कठड्यावर चढला नदीच्या आणि सर्वांग झोकून दिले प्रवाहात
अग वाट काय पाहतेस... मी आलोय बघ... स्वताच्या अस्तित्वाचीपण राखरांगोळी केली......
___________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment