दानशुर कर्ण म्हणुन
सर्वत्र ख्याती झाली
शेवटची घटकासुद्धा त्याची
दान करण्यातच गेली
__________
लक्ष्मण शिर्के
2.26.2010
झाली जन्मभर अवहेलना
झाली जन्मभर अवहेलना
म्हणुन सुतपुत्र सुतपुत्र
माहित होत आईला
तो आपलाच आहे पुत्र
__________
लक्ष्मण शिर्के
म्हणुन सुतपुत्र सुतपुत्र
माहित होत आईला
तो आपलाच आहे पुत्र
__________
लक्ष्मण शिर्के
भान हरपुन जातं
अग वेडे अशावेळी
मनच कावरंबावरं होतं
आठवांच्या पसारयात
भान हरपुन जातं
__________
लक्ष्मण शिर्के
मनच कावरंबावरं होतं
आठवांच्या पसारयात
भान हरपुन जातं
__________
लक्ष्मण शिर्के
एवढ माझ मोठं मन
आठवांचा पसारा तु
कसा काय सावरणार
एवढ माझ मोठं मन
तुला कस काय आवरणार
__________
लक्ष्मण शिर्के
कसा काय सावरणार
एवढ माझ मोठं मन
तुला कस काय आवरणार
__________
लक्ष्मण शिर्के
जिवनच असच असतं
जिवनच असच असतं
त्याला धाडसाने सामोरे जा
दुख असतं नेहमीच नशिबी
स्वताकडे उत्साहात पहात रहा
__________
लक्ष्मण शिर्के
त्याला धाडसाने सामोरे जा
दुख असतं नेहमीच नशिबी
स्वताकडे उत्साहात पहात रहा
__________
लक्ष्मण शिर्के
प्रेमाच नात एक रोज
प्रेमाच नात एक रोज
वेगळीच भरारी घेत असतं
एकमेकांबद्दल आदर होऊन
भावनेच्या आहारी जात असतं
__________
लक्ष्मण शिर्के
वेगळीच भरारी घेत असतं
एकमेकांबद्दल आदर होऊन
भावनेच्या आहारी जात असतं
__________
लक्ष्मण शिर्के
जगत असताना जरा
जगत असताना जरा
मान सन्मान पण पहावे
हसत खेळत मनमुरादपणे
नात्यात गुंतुन रहावे
__________
लक्ष्मण शिर्के
मान सन्मान पण पहावे
हसत खेळत मनमुरादपणे
नात्यात गुंतुन रहावे
__________
लक्ष्मण शिर्के
दुखच वर असते
नाहीतरी सुखापेक्षा जास्त
दुखाचीच भर असते
आनंद मिळविताना पण
दुखच वर असते
__________
लक्ष्मण शिर्के
दुखाचीच भर असते
आनंद मिळविताना पण
दुखच वर असते
__________
लक्ष्मण शिर्के
मैत्रिचं प्रेमच निराळं
मैत्रिचं प्रेमच निराळं
सर्व नात्याहुन थोर
एकाचं जरी मन दुखावल
दुसरयास वाटे हुरहुर
__________
लक्ष्मण शिर्के
सर्व नात्याहुन थोर
एकाचं जरी मन दुखावल
दुसरयास वाटे हुरहुर
__________
लक्ष्मण शिर्के
जेव्हा आठव मज होते
जेव्हा आठव मज होते
कातरवेळच्या त्या क्षणांची
मन सैरभैर होत आठवुन
चलबिचल दोन मनांची
__________
लक्ष्मण शिर्के
कातरवेळच्या त्या क्षणांची
मन सैरभैर होत आठवुन
चलबिचल दोन मनांची
__________
लक्ष्मण शिर्के
नशिबाला दोष देताना
नशिबाला दोष देताना
माणुस विचार करत नाही
आपण चुकतच नाही
या विश्वासावर ठाम राही
__________
लक्ष्मण शिर्के
माणुस विचार करत नाही
आपण चुकतच नाही
या विश्वासावर ठाम राही
__________
लक्ष्मण शिर्के
कधीकधी मन सैरभर होत
कधीकधी मन सैरभर होत
दुखाचा उबग जास्त असतो
अशा वेळी मनाला दोष दिल्यास
मनाचा अधिकच तोल फसतो
__________
लक्ष्मण शिर्के
दुखाचा उबग जास्त असतो
अशा वेळी मनाला दोष दिल्यास
मनाचा अधिकच तोल फसतो
__________
लक्ष्मण शिर्के
जीवनाला असतो मोठा
जीवनाला असतो मोठा
सुख दुखाचा आधार
आयुष्याच्या वाटचालीत
सोसावे लागतात भार
__________
लक्ष्मण शिर्के
सुख दुखाचा आधार
आयुष्याच्या वाटचालीत
सोसावे लागतात भार
__________
लक्ष्मण शिर्के
चुका होतात म्हनुन
चुका होतात म्हनुन अस
मध्येच थांबायच नसत
चालत राहिला तर यश
नाहीतर अपयश हमखास असत
__________
लक्ष्मण शिर्के
मध्येच थांबायच नसत
चालत राहिला तर यश
नाहीतर अपयश हमखास असत
__________
लक्ष्मण शिर्के
स्वतावर रोष घेऊ नये
प्रयत्न न करता उगीच
नशिबाला दोष देऊ नये
दुसरयाने केलेल्या चुकांचा
स्वतावर रोष घेऊ नये
__________
लक्ष्मण शिर्के
नशिबाला दोष देऊ नये
दुसरयाने केलेल्या चुकांचा
स्वतावर रोष घेऊ नये
__________
लक्ष्मण शिर्के
नियतीच्या आहारी गेलेला
नियतीच्या आहारी गेलेला
कधीच बाहेर येत नाही
मी स्वतालाही त्या गराड्यात
मुळी जाऊ देत नाही
__________
लक्ष्मण शिर्के
कधीच बाहेर येत नाही
मी स्वतालाही त्या गराड्यात
मुळी जाऊ देत नाही
__________
लक्ष्मण शिर्के
जुन्या आठवणी स्मरतात जेव्हा
जुन्या आठवणी स्मरतात जेव्हा
दुख मनीचे होते जागे
एकांतातल्या क्षणांचा खेळ
पुन्हा पुन्हा अंतर्मन बघे
__________
लक्ष्मण शिर्के
दुख मनीचे होते जागे
एकांतातल्या क्षणांचा खेळ
पुन्हा पुन्हा अंतर्मन बघे
__________
लक्ष्मण शिर्के
भिरकावुन द्यावे दुखाचे ओझे
मनातील घाव ओले
फार काळ नसावे
भिरकावुन द्यावे दुखाचे ओझे
समाजासाठी थोडे हसावे
__________
लक्ष्मण शिर्के
फार काळ नसावे
भिरकावुन द्यावे दुखाचे ओझे
समाजासाठी थोडे हसावे
__________
लक्ष्मण शिर्के
नेहमीच येतो पावसाळा
नेहमीच येतो पावसाळा
नेहमीच येतो उन्हाळा
सृष्टीचक्र असे कायम
मैत्रित नेहमीचाच जिव्हाळा
__________
लक्ष्मण शिर्के
नेहमीच येतो उन्हाळा
सृष्टीचक्र असे कायम
मैत्रित नेहमीचाच जिव्हाळा
__________
लक्ष्मण शिर्के
खरा माणुस नेहमीच करतो
माणसाची रितच ही
दाखवतो नेहमीच जात
खरा माणुस नेहमीच करतो
आलेल्या परिस्थितीवर मात
__________
लक्ष्मण शिर्के
दाखवतो नेहमीच जात
खरा माणुस नेहमीच करतो
आलेल्या परिस्थितीवर मात
__________
लक्ष्मण शिर्के
आरक्षणाचा बशा घोडा
आरक्षणाचा बशा घोडा
स्वातंत्र्यापासुनच दामटला आहे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
मध्यमवर्गीय त्यात चिमटला आहे
__________
लक्ष्मण शिर्के
स्वातंत्र्यापासुनच दामटला आहे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
मध्यमवर्गीय त्यात चिमटला आहे
__________
लक्ष्मण शिर्के
मनुष्याची जात ही
मनुष्याची जात ही
अशीच सदासर्वदा राहणार
कुणी गोडीने साथ देणार
कुणी नावाची लाखोली वाहणार
__________
लक्ष्मण शिर्के
अशीच सदासर्वदा राहणार
कुणी गोडीने साथ देणार
कुणी नावाची लाखोली वाहणार
__________
लक्ष्मण शिर्के
पुढारय़ांचा देश आहे
पुढारय़ांचा देश आहे
खाणे त्यांचे काम आहे
चांगल्या योजना, सवलती
खिशात घालण्यातच राम आहे
__________
लक्ष्मण शिर्के
खाणे त्यांचे काम आहे
चांगल्या योजना, सवलती
खिशात घालण्यातच राम आहे
__________
लक्ष्मण शिर्के
पण आजच्या लोकशाहीत
तरुण रक्त सळसळतय
हाताच्या मुठीसुद्धा वळतात
पण आजच्या लोकशाहीत
कायदेच कुठल्याकुठे पळतात
__________
लक्ष्मण शिर्के
हाताच्या मुठीसुद्धा वळतात
पण आजच्या लोकशाहीत
कायदेच कुठल्याकुठे पळतात
__________
लक्ष्मण शिर्के
शिवबाचे आम्ही मावळे
शिवबाचे आम्ही मावळे
भिती ना वाटे कुणाची
नाव जरी काढले मराठी
पळता भुई होते शत्रुंची
__________
लक्ष्मण शिर्के
भिती ना वाटे कुणाची
नाव जरी काढले मराठी
पळता भुई होते शत्रुंची
__________
लक्ष्मण शिर्के
सकाळच्या या धुंदीत
सकाळच्या या धुंदीत
मनी आठवणींचे जाळे
स्वप्नातली अर्धवट भेट तिची
मज काहीच ना कळे
__________
लक्ष्मण शिर्के
मनी आठवणींचे जाळे
स्वप्नातली अर्धवट भेट तिची
मज काहीच ना कळे
__________
लक्ष्मण शिर्के
एकांती भेटीसाठी मी
एकांती भेटीसाठी मी
नेहमीच वाट पाहतो
मावळतीच्या कातरवेळी
विरह होऊन राहतो
__________
लक्ष्मण शिर्के
नेहमीच वाट पाहतो
मावळतीच्या कातरवेळी
विरह होऊन राहतो
__________
लक्ष्मण शिर्के
सारयांची सुखदुखे पाहुन
मनातले भाव बोलायला
जरा दुनियेचा पसारा उघड
सारयांची सुखदुखे पाहुन
मानवतेची लागते नितांत ओढ
__________
लक्ष्मण शिर्के
जरा दुनियेचा पसारा उघड
सारयांची सुखदुखे पाहुन
मानवतेची लागते नितांत ओढ
__________
लक्ष्मण शिर्के
भाव निशब्द होऊन राहिले
विरह होऊन त्याला मी
ह्र्दयाने रडताना पाहिले
काही क्षण अवाक होऊन
भाव निशब्द होऊन राहिले
__________
लक्ष्मण शिर्के
ह्र्दयाने रडताना पाहिले
काही क्षण अवाक होऊन
भाव निशब्द होऊन राहिले
__________
लक्ष्मण शिर्के
प्रेम म्हटले की
प्रेम म्हटले की विरह असतोच
त्यात तर खरी मजा असते
उगीच लोक खुळ घेतात डोक्यात
विरह म्हणे एक सजा असते
__________
लक्ष्मण शिर्के
त्यात तर खरी मजा असते
उगीच लोक खुळ घेतात डोक्यात
विरह म्हणे एक सजा असते
__________
लक्ष्मण शिर्के
कठीण अस काहीच नसत
कठीण अस काहीच नसत
सगळ असत सोप फार
समजुन घेतल एकमेकाला की
शब्दाला येते आपल्या धार
__________
लक्ष्मण शिर्के
सगळ असत सोप फार
समजुन घेतल एकमेकाला की
शब्दाला येते आपल्या धार
__________
लक्ष्मण शिर्के
तुझ ते निर्मळ प्रेम
तुझ ते निर्मळ प्रेम
एकदाचं घेऊदे आकार
फ़ेकुन दे शब्द ह्र्दयाबाहेर
स्वप्न होऊन जाउदे साकार
__________
लक्ष्मण शिर्के
एकदाचं घेऊदे आकार
फ़ेकुन दे शब्द ह्र्दयाबाहेर
स्वप्न होऊन जाउदे साकार
__________
लक्ष्मण शिर्के
प्रेम हे असच असत
प्रेम हे असच असत
कधी ते कुणावर रुसत
एक तळमळत असल की
दुसर त्याला गोंजारत बसत
__________
लक्ष्मण शिर्के
कधी ते कुणावर रुसत
एक तळमळत असल की
दुसर त्याला गोंजारत बसत
__________
लक्ष्मण शिर्के
फुकटखाऊ (कविता)
हरवलय काहीतरी .... कुठेतरी...
पण काहीच कळत नाही..
झगडतोय कधीतरी.. कष्ट घेतोय शोधायला
पण काहीच मिळत नाही.......
फुकटखाऊ नावच माझ
त्यात माझी चुक नाही
आता सुधारायला जातोय
ती गोष्ट मिळुन येत नाही
येईल तसा दिवस ढकलतोय
काही फुकट मिळतय का पाहतोय
नाहीच मिळाल आयतं तर
थोडीफार शरीराची हालचाल करतोय
फुकट पण मिळत होत
घाम गाळावा वाटत नव्हता
एकट्याला किती लागणार लागुन
बाकीच्यांचा प्रश्न मिटत नव्हता
म्हनुन लागली होती थोडीफार हुरहुर
कारण मनुष्यमन आहे माझे
कधी पडायचा जेव्हा डोक्यात प्रकाश
शरमेने तेव्हा मन सुद्धा लाजे
आता वय पण झुकलय
म्हणुन जीवाला लागलाय घोर
पोरं पण माझ्यासारखीच आळशी
कधी त्यांना सापडणार दोर
संपलय सगळ सारं काही
दुबळ्या मानसिकतेने ग्रासतोय
हरवलय काहीतरी... कुठेतरी...
आळशीपणाचे हाल सोसतोय
म्हणुन तुम्हाला एकच सल्ला
फुकटखाऊपणा कधी करु नका
कष्ट करा काम करा
माझ्यासारखे नंतर झुरु नका
_____________
लक्ष्मण शिर्के
पण काहीच कळत नाही..
झगडतोय कधीतरी.. कष्ट घेतोय शोधायला
पण काहीच मिळत नाही.......
फुकटखाऊ नावच माझ
त्यात माझी चुक नाही
आता सुधारायला जातोय
ती गोष्ट मिळुन येत नाही
येईल तसा दिवस ढकलतोय
काही फुकट मिळतय का पाहतोय
नाहीच मिळाल आयतं तर
थोडीफार शरीराची हालचाल करतोय
फुकट पण मिळत होत
घाम गाळावा वाटत नव्हता
एकट्याला किती लागणार लागुन
बाकीच्यांचा प्रश्न मिटत नव्हता
म्हनुन लागली होती थोडीफार हुरहुर
कारण मनुष्यमन आहे माझे
कधी पडायचा जेव्हा डोक्यात प्रकाश
शरमेने तेव्हा मन सुद्धा लाजे
आता वय पण झुकलय
म्हणुन जीवाला लागलाय घोर
पोरं पण माझ्यासारखीच आळशी
कधी त्यांना सापडणार दोर
संपलय सगळ सारं काही
दुबळ्या मानसिकतेने ग्रासतोय
हरवलय काहीतरी... कुठेतरी...
आळशीपणाचे हाल सोसतोय
म्हणुन तुम्हाला एकच सल्ला
फुकटखाऊपणा कधी करु नका
कष्ट करा काम करा
माझ्यासारखे नंतर झुरु नका
_____________
लक्ष्मण शिर्के
प्रेरणा (कविता)
प्रेरणा
न्युज पेपर टीव्ही चानल बातम्या दिसत आहेत
शिक्षणाच्या ओझ्याखाली मुले हाल सोसत आहेत
खर काय आणि खोट काय समजुन घेतल पाहिजे
मुलांत असलेले न्युनगंड उमजुन घेतल पाहिजे
अपयश पदरी आलेले संकुचित विचारांचा गुत्त्या
कुणाचे येथे चुकते का करतात मुले आत्महत्या
कोण येथे सांगा चुकतो पालक की शिक्षक
उगीचच करु नका कुणालाही फालतु भक्षक
लहानपणापासुन आपण देतो प्रेम आणि आशिर्वाद
प्रत्येक चुक सुधारण्यासाठी आपणच घालतो साद
तरीपन ते चुकीच्या मार्गाला का वळतात
वेड्यासारखी कोवळी मने अशा गोष्टींस का मिळतात
कोण सांगणार त्यांना जीवन म्हणजे खडतर प्रवास
थोडं काही घडल तरी करुन घेतात स्वताचा र्हास
नैराश्याचे जीवनाची जर आत्तापासुनच धरली कास
आर्थिक महासत्तेचं स्वप्न कधी सार्थ होणार विश्वास
आपण त्यांच्या पाठीशी कट्टरतेनं उभ राहायला हव
क्षणिक असत यश अपयश त्यांना सांगायला हव
समजवा त्यांना ध्येय प्रेरणा ठेवणं चांगल असतं
कुणीतरी आपल्या यशाची नेहमी वाट पाहत असतं
________________
लक्ष्मण शिर्के
न्युज पेपर टीव्ही चानल बातम्या दिसत आहेत
शिक्षणाच्या ओझ्याखाली मुले हाल सोसत आहेत
खर काय आणि खोट काय समजुन घेतल पाहिजे
मुलांत असलेले न्युनगंड उमजुन घेतल पाहिजे
अपयश पदरी आलेले संकुचित विचारांचा गुत्त्या
कुणाचे येथे चुकते का करतात मुले आत्महत्या
कोण येथे सांगा चुकतो पालक की शिक्षक
उगीचच करु नका कुणालाही फालतु भक्षक
लहानपणापासुन आपण देतो प्रेम आणि आशिर्वाद
प्रत्येक चुक सुधारण्यासाठी आपणच घालतो साद
तरीपन ते चुकीच्या मार्गाला का वळतात
वेड्यासारखी कोवळी मने अशा गोष्टींस का मिळतात
कोण सांगणार त्यांना जीवन म्हणजे खडतर प्रवास
थोडं काही घडल तरी करुन घेतात स्वताचा र्हास
नैराश्याचे जीवनाची जर आत्तापासुनच धरली कास
आर्थिक महासत्तेचं स्वप्न कधी सार्थ होणार विश्वास
आपण त्यांच्या पाठीशी कट्टरतेनं उभ राहायला हव
क्षणिक असत यश अपयश त्यांना सांगायला हव
समजवा त्यांना ध्येय प्रेरणा ठेवणं चांगल असतं
कुणीतरी आपल्या यशाची नेहमी वाट पाहत असतं
________________
लक्ष्मण शिर्के
2.10.2010
१४ फ़ेब्रुवारी (२) (कविता)
रात्र रात्र डोळयास डोळा नाही
गणपत आमचा पुस्तकात बघेना
२४ तास डोळ्यासमोर "ती"
शिकविण्याकडे तर चित्तच लागेना
चार चौघांना घेऊन तो
कोलेजच्या व्हरांड्यात फिरतोय
ती कुठे दिसतेय का ते
मित्रांसमवेत हेरतोय
कधी तरी चुकुनवाकुन
एका कोपरयात उभी दिसते
खुष होऊन याची स्वारी
गालातल्या गालात हसते
मित्रांच्या टिंगलटवाळीने
हा भलताच भारावतो
स्वतामधला उत्साह वाढुन
कुठल्याकुठेच हरवतो
बाकी काही असो पण
याच प्रेम आता वाढलय
येणारया १४ तारखेसाठी
याच घोडं अडलय
________________
लक्ष्मण शिर्के
गणपत आमचा पुस्तकात बघेना
२४ तास डोळ्यासमोर "ती"
शिकविण्याकडे तर चित्तच लागेना
चार चौघांना घेऊन तो
कोलेजच्या व्हरांड्यात फिरतोय
ती कुठे दिसतेय का ते
मित्रांसमवेत हेरतोय
कधी तरी चुकुनवाकुन
एका कोपरयात उभी दिसते
खुष होऊन याची स्वारी
गालातल्या गालात हसते
मित्रांच्या टिंगलटवाळीने
हा भलताच भारावतो
स्वतामधला उत्साह वाढुन
कुठल्याकुठेच हरवतो
बाकी काही असो पण
याच प्रेम आता वाढलय
येणारया १४ तारखेसाठी
याच घोडं अडलय
________________
लक्ष्मण शिर्के
१४ फ़ेब्रुवारी (कविता)
गणपत उठला सकाळी सकाळी
विचारचक्र चालु झाले
१४ तारीख जवळ आली
चित्त पुन्हा तिच्यात रमले
सुरुवात कुठुन कशी करायची
कसा लावायचा तिला लळा
नाहीतर उगीच व्हायच तिसरच
भितीचा पण उठतोय गोळा
आठवडा झाला दुकाने पाहतोय
एक पण ग्रीटिंग पसंद नाही
तिला काय नक्की आवडतं
याला कसलाच गंध नाही
चुकुन जरी नजर दिली
याच्या छातीत धकधक होतं
ओठावर आलेले शब्द पण
अजिबात बोलायच राहुन जातं
काहीही झालं तरी त्याने
केलीय सर्वता तयारी
या १४ तारखेला मात्र
ईच्छा तो करणार पुरी
________________
लक्ष्मण शिर्के
विचारचक्र चालु झाले
१४ तारीख जवळ आली
चित्त पुन्हा तिच्यात रमले
सुरुवात कुठुन कशी करायची
कसा लावायचा तिला लळा
नाहीतर उगीच व्हायच तिसरच
भितीचा पण उठतोय गोळा
आठवडा झाला दुकाने पाहतोय
एक पण ग्रीटिंग पसंद नाही
तिला काय नक्की आवडतं
याला कसलाच गंध नाही
चुकुन जरी नजर दिली
याच्या छातीत धकधक होतं
ओठावर आलेले शब्द पण
अजिबात बोलायच राहुन जातं
काहीही झालं तरी त्याने
केलीय सर्वता तयारी
या १४ तारखेला मात्र
ईच्छा तो करणार पुरी
________________
लक्ष्मण शिर्के
खरच लाज वाटत आहे (कविता)
आजही कितीतरी जण इथे
मरण यातना भोगत आहेत
मानवतेच्या कठोर जगात
सुखासाठी जगत आहेत
मानवी जीवनाचा आदर्श
भ्रष्टाचाराने कापला जातोय
वखवखलेल्या स्वार्थी नजरांचा
नकली भाव जपला जातोय
अनैतिकता अमानुषता
दंभ सारा माजत आहे
क्षणोक्षणी असहाय शेतकरी
कोरड्या डोळ्यांनी भिजत आहे
हिंस्त्र श्वापदांच्या वासनांधी नजरा
एकाकी स्त्रिवर टपतात
भयव्याकुळ नजरेने ते जीव
प्राणभिक मागतात
जीवंतपणीच स्मशानज्वाला
उरी काहींच्या पेटत आहे
आजकाल माणसाला माणुस म्हणायला
खरच लाज वाटत आहे
_______________
लक्ष्मण शिर्के
मरण यातना भोगत आहेत
मानवतेच्या कठोर जगात
सुखासाठी जगत आहेत
मानवी जीवनाचा आदर्श
भ्रष्टाचाराने कापला जातोय
वखवखलेल्या स्वार्थी नजरांचा
नकली भाव जपला जातोय
अनैतिकता अमानुषता
दंभ सारा माजत आहे
क्षणोक्षणी असहाय शेतकरी
कोरड्या डोळ्यांनी भिजत आहे
हिंस्त्र श्वापदांच्या वासनांधी नजरा
एकाकी स्त्रिवर टपतात
भयव्याकुळ नजरेने ते जीव
प्राणभिक मागतात
जीवंतपणीच स्मशानज्वाला
उरी काहींच्या पेटत आहे
आजकाल माणसाला माणुस म्हणायला
खरच लाज वाटत आहे
_______________
लक्ष्मण शिर्के
व्हेलेंटाईन डे (कविता)
अलिकडच्या काळातच खुळ माजलय
पुर्वी नव्हत अस काही
पोर पोरीबी बिघडतात अशानं
का फोरिन ची संस्कृती हातात घेई
किती देऊ उदाहरणे
कृष्ण-राधा, बाजीराव-मस्तानी
नसतं त्यांना पटलं
वेलेंटाईन डे च विदेशी पाणी
आपल्याच मराठीपनाचं आपल्याला
करता येत नाही रक्षण
त्यामुळच चाललय आजकाल
महाराष्ट्राचं अस भक्षण
मला सांगा हे असलं प्रेम
करणारा नेहमीच करत असतो
मग हा एकच दिवस
त्यास्नी का उठुन दिसतो
परंपरांचा झालाय कचरा
संस्कृतीच चाललय शोषण
स्वप्नातला भारत पाहतोय
कधी होणार सर्वार्थाने भुषण
______________
लक्ष्मण शिर्के
पुर्वी नव्हत अस काही
पोर पोरीबी बिघडतात अशानं
का फोरिन ची संस्कृती हातात घेई
किती देऊ उदाहरणे
कृष्ण-राधा, बाजीराव-मस्तानी
नसतं त्यांना पटलं
वेलेंटाईन डे च विदेशी पाणी
आपल्याच मराठीपनाचं आपल्याला
करता येत नाही रक्षण
त्यामुळच चाललय आजकाल
महाराष्ट्राचं अस भक्षण
मला सांगा हे असलं प्रेम
करणारा नेहमीच करत असतो
मग हा एकच दिवस
त्यास्नी का उठुन दिसतो
परंपरांचा झालाय कचरा
संस्कृतीच चाललय शोषण
स्वप्नातला भारत पाहतोय
कधी होणार सर्वार्थाने भुषण
______________
लक्ष्मण शिर्के
2.08.2010
प्रेम म्हणजे नक्की काय? (कविता)
आज पुन्हा डोक्यात
प्रश्नांची सरबत्त्ती चालु हाय
मनच स्वताला विचारायला लागलय
प्रेम म्हणजे नक्की काय?
अनेक तर्क वितर्क
अनेकांच्या प्रतिक्रिया
रोज बदलतात नवे रंग
पण प्रश्नच सुटत नाय......
प्रेम देत आयुष्याला
सावरण्याचं बळ
मग का कधिकधी मांडते
मतलबी नात्यांचा खेळ
घट्ट जखडलेल्या नात्यांचाही
बसत नाही मेळ
क्षणार्धात तुटतात नाती
पन जोडायला जातो खुप वेळ
प्रेम हव असेल तर
त्यात पडाव का लागत
आणि नाही मिळाल तर
अश्रुंबरोबर का जागत?
प्रेम म्हणजे भक्ती
कधी कधी होते सक्ती
कधी होते जबाबदारी
तर खर्च होते कधी शक्ती
पुन्हा पुन्हा राहुन वाटतय
प्रेम म्हणजे नक्की काय?
मनाचा झालेला गोंधळ माझ्या
अजुनही कसलाच सुटत नाय
__________
लक्ष्मण शिर्के
प्रश्नांची सरबत्त्ती चालु हाय
मनच स्वताला विचारायला लागलय
प्रेम म्हणजे नक्की काय?
अनेक तर्क वितर्क
अनेकांच्या प्रतिक्रिया
रोज बदलतात नवे रंग
पण प्रश्नच सुटत नाय......
प्रेम देत आयुष्याला
सावरण्याचं बळ
मग का कधिकधी मांडते
मतलबी नात्यांचा खेळ
घट्ट जखडलेल्या नात्यांचाही
बसत नाही मेळ
क्षणार्धात तुटतात नाती
पन जोडायला जातो खुप वेळ
प्रेम हव असेल तर
त्यात पडाव का लागत
आणि नाही मिळाल तर
अश्रुंबरोबर का जागत?
प्रेम म्हणजे भक्ती
कधी कधी होते सक्ती
कधी होते जबाबदारी
तर खर्च होते कधी शक्ती
पुन्हा पुन्हा राहुन वाटतय
प्रेम म्हणजे नक्की काय?
मनाचा झालेला गोंधळ माझ्या
अजुनही कसलाच सुटत नाय
__________
लक्ष्मण शिर्के
भुत बंगला (कविता)
गावच्या वेशीवर
पडक्या हनुमानाच्या मंदिरामागे
आहे एक लिंबाचे भले मोठे
जीर्ण झालेले झाड
तिथुन सरळ झाडीतुनच
पायवाट निघते ती
थेट जुन्या भल्या मोठ्या अडगळीतल्या वाड्यावर.........
एक मोडकळीस आलेला वाडा
भला मोठा सारा गाव मावेल
वाड्यातला मधोमध भकास मोकळा परिसर
तेथेच दिसणारे जुने तुळशीवृंदावन
वाळवी लागलेल्या तुळया
जिथे तिथे तडे गेलेल्या मातीच्या भिंती
लोखंडी वाकलेल्या गजांच्या खिडक्या,
काळवंडलेल्या दिवळ्या, अंधार, शुकशुकाट
म्हणे या वाड्यावर
एक म्हातारी रहायची
रात्र झाल्यावर हातात कंदिल घेवुन
गुपचुप बाहेर पडायची
पहाटेच्या अगोदरच
पुन्हा त्या वाड्यावर जायची
कुणाकुणाला ती दिसायची
पण जवळ जाण्याची हिंमत नसायची
कालांतराने ती म्हातारीसुद्धा दिसेनाशी झाली
कुणी म्हणे ती हडळ होवुन तिथे नेहमीच वावरते
आणि म्हणे लहानग्यांपासुन बाया बापड्यांपर्यंत
ती कुणालाही धरते कुनालाही लागते
भर दिवसासुद्धा माणुस घाबरेल
अशा निर्जन ठिकाणी जायला
आजही भलेभले भांबावतात तिथे जायला
ह्र्द्याचे ठोके वाढतात गावकरयांचे
नुसते नाव जरी काढले
"भुत बंगला"
__________
लक्ष्मण शिर्के
पडक्या हनुमानाच्या मंदिरामागे
आहे एक लिंबाचे भले मोठे
जीर्ण झालेले झाड
तिथुन सरळ झाडीतुनच
पायवाट निघते ती
थेट जुन्या भल्या मोठ्या अडगळीतल्या वाड्यावर.........
एक मोडकळीस आलेला वाडा
भला मोठा सारा गाव मावेल
वाड्यातला मधोमध भकास मोकळा परिसर
तेथेच दिसणारे जुने तुळशीवृंदावन
वाळवी लागलेल्या तुळया
जिथे तिथे तडे गेलेल्या मातीच्या भिंती
लोखंडी वाकलेल्या गजांच्या खिडक्या,
काळवंडलेल्या दिवळ्या, अंधार, शुकशुकाट
म्हणे या वाड्यावर
एक म्हातारी रहायची
रात्र झाल्यावर हातात कंदिल घेवुन
गुपचुप बाहेर पडायची
पहाटेच्या अगोदरच
पुन्हा त्या वाड्यावर जायची
कुणाकुणाला ती दिसायची
पण जवळ जाण्याची हिंमत नसायची
कालांतराने ती म्हातारीसुद्धा दिसेनाशी झाली
कुणी म्हणे ती हडळ होवुन तिथे नेहमीच वावरते
आणि म्हणे लहानग्यांपासुन बाया बापड्यांपर्यंत
ती कुणालाही धरते कुनालाही लागते
भर दिवसासुद्धा माणुस घाबरेल
अशा निर्जन ठिकाणी जायला
आजही भलेभले भांबावतात तिथे जायला
ह्र्द्याचे ठोके वाढतात गावकरयांचे
नुसते नाव जरी काढले
"भुत बंगला"
__________
लक्ष्मण शिर्के
तु फक्त हो म्हण (कविता)
तु फक्त हो म्हण
पुढचे सगळे बघुन घेईन
कुणी काही बोलले तर
तुझा हात धरुन नेईन
तु फक्त हो म्हण
बाकिच्यांशी देणे नाही
तुच आहेस फक्त माझी
कुणाशीही घेणे नाही
तु फक्त हो म्हण
या वेळी फसवु नको
नाहीतरी नेहमीप्रमाणे
या वेड्याला रुसवु नको
तु फक्त हो म्हण
काय तुला हव आहे
प्रत्येक वेळी नवी वस्तु
मला काय नव आहे?
तु फक्त हो म्हण
रोज स्वप्नात तुलाच पाहतो
तुझ्या एका होकारासाठी
माझे जीवन तुला वाहतो
किती वेळा म्हणु तुला
"तु फक्त हो म्हण"
बस हे शेवटचच होत
यापुढे आता तुच जाण
__________
लक्ष्मण शिर्के
पुढचे सगळे बघुन घेईन
कुणी काही बोलले तर
तुझा हात धरुन नेईन
तु फक्त हो म्हण
बाकिच्यांशी देणे नाही
तुच आहेस फक्त माझी
कुणाशीही घेणे नाही
तु फक्त हो म्हण
या वेळी फसवु नको
नाहीतरी नेहमीप्रमाणे
या वेड्याला रुसवु नको
तु फक्त हो म्हण
काय तुला हव आहे
प्रत्येक वेळी नवी वस्तु
मला काय नव आहे?
तु फक्त हो म्हण
रोज स्वप्नात तुलाच पाहतो
तुझ्या एका होकारासाठी
माझे जीवन तुला वाहतो
किती वेळा म्हणु तुला
"तु फक्त हो म्हण"
बस हे शेवटचच होत
यापुढे आता तुच जाण
__________
लक्ष्मण शिर्के
Subscribe to:
Posts (Atom)