2.10.2010

१४ फ़ेब्रुवारी (कविता)

गणपत उठला सकाळी सकाळी
विचारचक्र चालु झाले
१४ तारीख जवळ आली
चित्त पुन्हा तिच्यात रमले

सुरुवात कुठुन कशी करायची
कसा लावायचा तिला लळा
नाहीतर उगीच व्हायच तिसरच
भितीचा पण उठतोय गोळा

आठवडा झाला दुकाने पाहतोय
एक पण ग्रीटिंग पसंद नाही
तिला काय नक्की आवडतं
याला कसलाच गंध नाही

चुकुन जरी नजर दिली
याच्या छातीत धकधक होतं
ओठावर आलेले शब्द पण
अजिबात बोलायच राहुन जातं

काहीही झालं तरी त्याने
केलीय सर्वता तयारी
या १४ तारखेला मात्र
ईच्छा तो करणार पुरी
________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment