तु फक्त हो म्हण
पुढचे सगळे बघुन घेईन
कुणी काही बोलले तर
तुझा हात धरुन नेईन
तु फक्त हो म्हण
बाकिच्यांशी देणे नाही
तुच आहेस फक्त माझी
कुणाशीही घेणे नाही
तु फक्त हो म्हण
या वेळी फसवु नको
नाहीतरी नेहमीप्रमाणे
या वेड्याला रुसवु नको
तु फक्त हो म्हण
काय तुला हव आहे
प्रत्येक वेळी नवी वस्तु
मला काय नव आहे?
तु फक्त हो म्हण
रोज स्वप्नात तुलाच पाहतो
तुझ्या एका होकारासाठी
माझे जीवन तुला वाहतो
किती वेळा म्हणु तुला
"तु फक्त हो म्हण"
बस हे शेवटचच होत
यापुढे आता तुच जाण
__________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment