2.26.2010

प्रेरणा (कविता)

प्रेरणा
न्युज पेपर टीव्ही चानल बातम्या दिसत आहेत
शिक्षणाच्या ओझ्याखाली मुले हाल सोसत आहेत
खर काय आणि खोट काय समजुन घेतल पाहिजे
मुलांत असलेले न्युनगंड उमजुन घेतल पाहिजे

अपयश पदरी आलेले संकुचित विचारांचा गुत्त्या
कुणाचे येथे चुकते का करतात मुले आत्महत्या
कोण येथे सांगा चुकतो पालक की शिक्षक
उगीचच करु नका कुणालाही फालतु भक्षक

लहानपणापासुन आपण देतो प्रेम आणि आशिर्वाद
प्रत्येक चुक सुधारण्यासाठी आपणच घालतो साद
तरीपन ते चुकीच्या मार्गाला का वळतात
वेड्यासारखी कोवळी मने अशा गोष्टींस का मिळतात

कोण सांगणार त्यांना जीवन म्हणजे खडतर प्रवास
थोडं काही घडल तरी करुन घेतात स्वताचा र्हास
नैराश्याचे जीवनाची जर आत्तापासुनच धरली कास
आर्थिक महासत्तेचं स्वप्न कधी सार्थ होणार विश्वास

आपण त्यांच्या पाठीशी कट्टरतेनं उभ राहायला हव
क्षणिक असत यश अपयश त्यांना सांगायला हव
समजवा त्यांना ध्येय प्रेरणा ठेवणं चांगल असतं
कुणीतरी आपल्या यशाची नेहमी वाट पाहत असतं
________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment