हरवलय काहीतरी .... कुठेतरी...
पण काहीच कळत नाही..
झगडतोय कधीतरी.. कष्ट घेतोय शोधायला
पण काहीच मिळत नाही.......
फुकटखाऊ नावच माझ
त्यात माझी चुक नाही
आता सुधारायला जातोय
ती गोष्ट मिळुन येत नाही
येईल तसा दिवस ढकलतोय
काही फुकट मिळतय का पाहतोय
नाहीच मिळाल आयतं तर
थोडीफार शरीराची हालचाल करतोय
फुकट पण मिळत होत
घाम गाळावा वाटत नव्हता
एकट्याला किती लागणार लागुन
बाकीच्यांचा प्रश्न मिटत नव्हता
म्हनुन लागली होती थोडीफार हुरहुर
कारण मनुष्यमन आहे माझे
कधी पडायचा जेव्हा डोक्यात प्रकाश
शरमेने तेव्हा मन सुद्धा लाजे
आता वय पण झुकलय
म्हणुन जीवाला लागलाय घोर
पोरं पण माझ्यासारखीच आळशी
कधी त्यांना सापडणार दोर
संपलय सगळ सारं काही
दुबळ्या मानसिकतेने ग्रासतोय
हरवलय काहीतरी... कुठेतरी...
आळशीपणाचे हाल सोसतोय
म्हणुन तुम्हाला एकच सल्ला
फुकटखाऊपणा कधी करु नका
कष्ट करा काम करा
माझ्यासारखे नंतर झुरु नका
_____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment