रात्र रात्र डोळयास डोळा नाही
गणपत आमचा पुस्तकात बघेना
२४ तास डोळ्यासमोर "ती"
शिकविण्याकडे तर चित्तच लागेना
चार चौघांना घेऊन तो
कोलेजच्या व्हरांड्यात फिरतोय
ती कुठे दिसतेय का ते
मित्रांसमवेत हेरतोय
कधी तरी चुकुनवाकुन
एका कोपरयात उभी दिसते
खुष होऊन याची स्वारी
गालातल्या गालात हसते
मित्रांच्या टिंगलटवाळीने
हा भलताच भारावतो
स्वतामधला उत्साह वाढुन
कुठल्याकुठेच हरवतो
बाकी काही असो पण
याच प्रेम आता वाढलय
येणारया १४ तारखेसाठी
याच घोडं अडलय
________________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment