2.10.2010

व्हेलेंटाईन डे (कविता)

अलिकडच्या काळातच खुळ माजलय
पुर्वी नव्हत अस काही
पोर पोरीबी बिघडतात अशानं
का फोरिन ची संस्कृती हातात घेई


किती देऊ उदाहरणे
कृष्ण-राधा, बाजीराव-मस्तानी
नसतं त्यांना पटलं
वेलेंटाईन डे च विदेशी पाणी

आपल्याच मराठीपनाचं आपल्याला
करता येत नाही रक्षण
त्यामुळच चाललय आजकाल
महाराष्ट्राचं अस भक्षण

मला सांगा हे असलं प्रेम
करणारा नेहमीच करत असतो
मग हा एकच दिवस
त्यास्नी का उठुन दिसतो

परंपरांचा झालाय कचरा
संस्कृतीच चाललय शोषण
स्वप्नातला भारत पाहतोय
कधी होणार सर्वार्थाने भुषण
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment