आजही कितीतरी जण इथे
मरण यातना भोगत आहेत
मानवतेच्या कठोर जगात
सुखासाठी जगत आहेत
मानवी जीवनाचा आदर्श
भ्रष्टाचाराने कापला जातोय
वखवखलेल्या स्वार्थी नजरांचा
नकली भाव जपला जातोय
अनैतिकता अमानुषता
दंभ सारा माजत आहे
क्षणोक्षणी असहाय शेतकरी
कोरड्या डोळ्यांनी भिजत आहे
हिंस्त्र श्वापदांच्या वासनांधी नजरा
एकाकी स्त्रिवर टपतात
भयव्याकुळ नजरेने ते जीव
प्राणभिक मागतात
जीवंतपणीच स्मशानज्वाला
उरी काहींच्या पेटत आहे
आजकाल माणसाला माणुस म्हणायला
खरच लाज वाटत आहे
_______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment