2.08.2010

भुत बंगला (कविता)

गावच्या वेशीवर
पडक्या हनुमानाच्या मंदिरामागे
आहे एक लिंबाचे भले मोठे
जीर्ण झालेले झाड
तिथुन सरळ झाडीतुनच
पायवाट निघते ती
थेट जुन्या भल्या मोठ्या अडगळीतल्या वाड्यावर.........

एक मोडकळीस आलेला वाडा
भला मोठा सारा गाव मावेल
वाड्यातला मधोमध भकास मोकळा परिसर
तेथेच दिसणारे जुने तुळशीवृंदावन
वाळवी लागलेल्या तुळया
जिथे तिथे तडे गेलेल्या मातीच्या भिंती
लोखंडी वाकलेल्या गजांच्या खिडक्या,
काळवंडलेल्या दिवळ्या, अंधार, शुकशुकाट

म्हणे या वाड्यावर
एक म्हातारी रहायची
रात्र झाल्यावर हातात कंदिल घेवुन
गुपचुप बाहेर पडायची
पहाटेच्या अगोदरच
पुन्हा त्या वाड्यावर जायची
कुणाकुणाला ती दिसायची
पण जवळ जाण्याची हिंमत नसायची

कालांतराने ती म्हातारीसुद्धा दिसेनाशी झाली
कुणी म्हणे ती हडळ होवुन तिथे नेहमीच वावरते
आणि म्हणे लहानग्यांपासुन बाया बापड्यांपर्यंत
ती कुणालाही धरते कुनालाही लागते
भर दिवसासुद्धा माणुस घाबरेल
अशा निर्जन ठिकाणी जायला
आजही भलेभले भांबावतात तिथे जायला
ह्र्द्याचे ठोके वाढतात गावकरयांचे
नुसते नाव जरी काढले
"भुत बंगला"
__________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment