1.30.2010

वाटत मनात खुप

कामावर निघताना सुद्धा
थंडीचा असतो बहर
जावेच लागते कामावर जरी
मनात दांडी मारण्याची लहर
___________
लक्ष्मण शिर्के

शब्दांनी मी कधीच दुर नाही
शब्द आहेत माझे सखे
वेडेवाकडे कसेही चालतात
कधीही राहत नाहीत मुके
___________
लक्ष्मण शिर्के

शांतपणे रस्ता चालताना
अनेक विचार मनात येतात
विचारांच्या गोंधळात कित्येक वेळा
विसरतो किती वळणे जातात
___________
लक्ष्मण शिर्के

हसतीलही मला आज
पण नाही कुणावर रागावणार
पण मनाची ओळख त्यांच्या
मला सहज लगेच भावणार
___________
लक्ष्मण शिर्के

आपत्तीस कारण झाले
व्रुक्षतोड केली मानवाने
तरीपन आपली चुकच नाही
अविर्भाव दाखवितो अभिमानाने
___________
लक्ष्मण शिर्के

पक्षांतर्गत मतभेद
नेहमीच चालु राहतो
निष्पाप मायबापांकडे पाहुन
माझाच मी न राहतो
___________
लक्ष्मण शिर्के

वाटत मनात खुप
नेहमीच मिळाव सुख
पण चालुन येत जीवनात
सुखापेक्षा जास्त दुख
___________
लक्ष्मण शिर्के

1 comment: