अजुन किती संयम धरू
तूच सांग आता
दररोज तोच तोच
एकच गिरविते कित्ता
तुझे रुसने मला
कधी कधी गोड वाटते
संभ्रमित होतो मी कधी
माझी पण पापणी मिटते
हव्यास हा मनाचा
अंत कुठे आहे
विराहाच्या क्षणांची
मज भ्रांत कुठे आहे
आठवतेस तू जेव्हा
स्वप्न माझे मोडते
झोपेतून उठुन मग
तुझीच मूर्ती पिडते
अनुभव आणि आठवणी
झुरवतात मजला
रुसने फुगने नेहमीचेच
अश्रूंचा पूर ओसरून गेला
तुझ्या माझ्या नात्याचे
अल्लड असे एक नाव
नेहमीच तुला सांगेन
धरू नको आता हाव
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment