शब्दांशी खेळताना नेहमीच जपून खेळावे
ओंजळीत घेताना त्याना जपून धरावे
सांडू नये याची दक्षता घ्यावी
आकाश आणि धरती शब्दान्निच एकत्र मिळावी
शब्द सांडले तरी त्याना आनंदात वेचावे
पुन्हा वाया जाऊ नये म्हणून एकत्रित रचावे
त्यात असतो रंग भावनांचा ओला
कधी कधी प्रेम तर कधी संघर्षाचा ओलावा
शब्दाना कधी आसवांत नहावे
भिजतात जेव्हा शब्द त्यांच्या आधाराला जावे
जीवन शून्य असते शब्दाविना
यातच तुम्ही शब्दाची महती जाणा
निराश मनाला सावरतात ते शब्द
अहंकारी मनाला शमवितात ते शब्द
कितीही गटांगळ्या खाल्ल्या तरी
पुन्हा जागेवर येणारे असतात ते शब्द
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment