विसरलोय मी आता ते एकाकीपण
जेव्हापासून आलेत जीवनात आनंदाचे क्षण
लोभते तुझे निर्मल हास्य मज
फुलून आलय आता माझे तन मन
असंख्य झाल्यात वेदना मला
संयम आणि धैर्य होते पाठीशी
दुसर्यासाठी स्वताला बदलत नव्हतो
तळमळलोय अनेकदा दुख घेऊन उराशी
एकाकीपणात छळवनुक झाली खूप
पण भीती कसली वाटत नव्हती
निर्धार ठेवला होता पुरेसा
भरती नंतर येणार होती ओहोटी
मन खूप तळमळत होते माझे
भ्रामक काल्पनिक सुख पाहत होते
अचानक रात्री बेरात्री जागे होऊन
पुन्हा स्वप्नात जात होते
समाजातील स्वार्थी आणि ढोन्गिपना
त्याच एकाकीपणात पाहिला
अगदी खरया वाटणार्या गोष्टींवरील पण
मनाचा विश्वास पूर्णपणे उडाला
पण तू आलिस अशी अचानक जीवनात
एकाकीपणाला गेला तडा
माझ्या ह्रद्याच्या अंगणात
गुलाब प्राजकताचा पडला सडा
आहेस तू आता मज बरोबर
विश्वास ठेव माझ्यावर
एकाकीपणाला भेदलेस माझ्या
जीव जडत चाललाय तुझ्यावर
__________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment