10.16.2009

सांग तू... (कविता)

सांग तू
सांग तू कशाला आलिस माझ्या स्वछन्दि जीवनात
आता काय करू मी नाही करू शकलो जर परिस्थितीवर मात !! !!
एकटाच बरा होतो
सुखात जगत होतो
नव्हती कशाची ओढ
वेळ पण आणि सवड
नव्हते जवळी कोणी म्हणून केलास असा का घात
सगळि वचने विसरूनी का सोडलिस तू अशी साथ !!1!!
नाही जरी लाभले प्रेम मला
नव्हती मला कशाचीच खंत
अचानक त्या तुझ्या येण्याने केला
माझ्या सार्‍या भावनेचा अंत
जीवनात तू माझ्या येता मी पण विसरलो सारी भ्रांत
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला निर्मल निर्झर शांत !!2!!
जीवनात या तुला मानिले
गोफ सुद्धा गुंफला होता
तो सुद्धा धागा तोडून
ठेवलास तू जाता जाता
जायचेच होते तुला तर सांग मला आलीस का
पाठशिवनिचा खेळ खेळताना न शिवताच गेलिस का !!3!!
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment