सगळ काही सम्पलय आता अश्रुही थांबले आहेत
राहून राहून अनेक वेळा माझ्याशी भान्डले आहेत
मनच आता काठावर आलय जगल एकदाच
जेव्हा गटांगळ्या खात होत सावट होत भीतीच
माझ्या बाबतीत नेहमीच ही गोष्ट घडत आली
आशा अपेक्षान्चा चक्काचूर होत एक एक घटना सरत गेली
वेध घेतला सुरुवातीला शंकेने मन ग्रासले
माहीत असूनही पडलो खोलात शेवटी अश्रुन्वाटे सोसले
ज्या गोष्टीसाठी चरफडलो पहात होतो नुसतीच वाट
डोळे सुद्धा थकून गेले मन घालत होते थांबण्यासाठी घाट
रोजची माझी झोळी रिकामीच राहात होती
परिस्थिती वचनाला विसरून माझ्याविरुद्ध वागत होती
किती तरी वेळा त्या आठवणी नुसत्याच उकरायचो
एक वेडी आशा समजून स्वप्नात त्यांस साकारायचो
माझ्याच आयुष्याशी भांडण हे रोजचच झाल होत रडगान
किती तरी दिवसांचा दुरावा होतच नव्हता सहन
शिल्लक आता काहीच नाही मनात काहीच येत नाही
जुन्या स्मृतीच्या वार्या देखील मनाला भेदुन जात नाही
दुख आता खूपच झाल विचार सुद्धा शमले आहेत
सगळ काही सम्पलय आता अश्रुही थांबले आहेत
______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment