जेव्हा शब्द घेऊन तू येतेस
किती छान आणि आनंदी असतेस
माझेसुद्धा मन मन्त्रमुग्ध होते
अस वाटते की तू निळाइच असतेस
मग तू माझ्या स्वप्नात येतेस
स्वप्नात पण तू मला शब्द देतेस
तेव्हा माझे स्वप्न भरारी घेते
तू मात्र तुझ्याच नादात बेभान असतेस
तुझ्या शब्दांची हळूवार साद
जेव्हा माझ्या कानी पडते
माझ्या निराश मनाला आधार मिळून
श्रावणाच्या उन्हात इंद्रधनू पडते
निराश मनाला जेव्हा उभारी मिळते
शब्द तुझे खूपच फुलतात
गुढ वाटते मला याचे कधी कधी
शब्दांची फुले सुगंध बनून वार्यावर झुलतात
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment