खूपच आठवत होते एकमेकांना
ते दोन जीव पाउस आणि हिरवीगार वनराई
जगुच शकत नव्हते एकमेकान्शिवाय
दोघांनाही झाली होती खूप भेटण्याची घाई
तिलासुद्धा माहीत होत त्यालासुद्धा माहीत होत
पाकळीतुन उमळलेल फूल लगेच सुकणार नव्हत
भीती एवढीच होती की पाकळीचा गंध उडून जाईल
ते बघून वनराई गाहिर्या दुखाणे वेडिपिसी होईल
त्यासाठी पावसाला लवकर बरसायचे होते
पाचूच्या हिरव्या रानांना भेटायचे होते
आस होती मिलनाचि विरह सहन होत नव्हता
प्राणी, पक्षी, फुले वेली मधुर गीत गात होते
एकदाचा मेघराजा गरजला चाहूल लागली येण्याची
प्रफुल्लित झाली वनराई बेहोश होऊन नाचू लागली
खूप दिवसांच्या वाटेवर आस लागली डोळ्यांची
बाहुपाशात सामावून घेण्यास वेड्यासारखी उत्सुक झाली
इतक्या दिवस उदास आललेला पाउस एकदाचा अंगाला झोम्बला
सैरभैर झाली वनराई तिचा श्वासच काही काळासाठी थांबला
त्याच्या रिप रिप पडन्याने काया झाली चिंब चिंब
काही कालावधीतच सुखाव्याने वनराई झाली ओलिचिम्ब
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment