1.07.2010

येशिल ना पुन्हा (कविता)

येशिल ना पुन्हा
खिड़कीत मी बसलोय
या शांत कातरवेळी
आठवनी काढत हसलोय

कस मी समजनार आपली
शेवटची भेट होती
तोंडाने तर मूक होतीस
पन नज़रेने बोलत होती

माझ्याही तोंडुन गेला असेल ग
एखाद दूसरा वेडा शब्द
मग त्यावर तू पन असा का
हट्ट धरून राहायच निशब्द

सार समजुन सुद्धा तेव्हा
न समजल्यासारखे दाखवलेस तू
वेळ निघून गेली होती तरी
नज़रेने थोडा वेळ अडवलेस तू

मीच आता प्रयत्न करेन
गप्प पडुन राहन्याचा
कारण नंतर मलाच त्रास होतो
आशा अविचारी बोलन्याचा

फकत एकदाच परतुनी ये
इच्छा नसेल तरी तुझी
तुझा असेल तो राग काढ माझ्यावर
समजेन समजुत काढतेस माझी
____________
लक्ष्मण शिर्के

2 comments: