आज मला चुकलो अस का वाटले
न पटुनसुद्धा बुद्धीने का पटवून घेतले
खरच इथे काय चाललाय कुणी सांगेल का मला
न चोरी करणार्यलाच का देता फाशीला
माहीत आहे आजच्या लोकशाहीचा हा नियम आहे
मला न पटुनसुद्धा मागे पुढे पर्याय न राहे
चुकला त्याला सोडता का तर मंत्र्याचा मुलगा आहे
आणि गरीबाने छोट्यशा चुकीला काही घोडे मारले आहे
खरच एखाद्याची जेव्हा सहन शक्ति संपते
आज समजले त्याचे मन आत्महत्येकडे का वळते
गरिबांनी केलेल्या घामावर तर हे उमदे जगतात
आणि निवडणुकीच्या काळापुरते बाहेर भीक मागतात
गरीब आपला देतो मते लोकशाहीचा नियम आहे
मग पाच वर्षे सत्ता भोगणे त्यांच्यासाठी कायम आहे
सत्तेच्या कालावधीत त्यांचा खिसा भरला जातो
गरीब मात्र त्यावेळी संकटे येऊन होरपळला जातो
मग कधीकधी लाचार होऊन छोटिशि मदत मागतात
त्यासाठी पण हे पुढारी गरिबांचेच मन बघतात
पांढरे डगले घालून हे लाल गाड्यांतून फिरतात
दिवसरात्र काम करून गरीब शेतकरी मारतात
समजत नाही यांना यांची कधी कीव येणार
एवढे साठवून पाप करून कुठे संपत्ती नेणार
चालायचे लोकशाही आहे नेहमी असेच चालणार
मुस्कटदाबी सगळीकडे आहे कोण कुणाला बोलणार
त्रास थोडा झाला की मला अशा कविता सुचतात
तळमळ मनाला होऊन डोळ्यापुढे काजवे नाचतात......
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment