8.17.2009

एक होत फुलपाखरू (कविता)

एक होत फुलपाखरू
त्याला मी पकडल
आमच्या दोघांमध्ये तेव्हा
नवीनच नात जडल

पकडताना जेव्हा मी
त्याने केली फडफड
माझ्या हृदयातील संवेदनांची
होऊ लागली धड्पड

क्षणार्धात जेव्हा त्यास
मी बंदिवान केले
आपण आता सुटणार नाही
त्याने चांगलेच ओळखले

दुसर्‍या दिवसापासून ते
अंगखांद्यावर बागडु लागल
माझ्याशी बोलताना ते
मित्रत्वाच्या नात्याने वागल

माझ्या जीवनातल्या जेव्हा त्याने
दुखाच्या पहिल्या झळा
मागील जीवनाचा विसर होऊन
त्याला आपोआपच लागला माझा लळा

त्याच हळव मन होत
लागल माझ्याशी जेव्हा मनातल बोलू
गुपित सगळ सांगून म्हणाले
आपल नाते प्रेमात तोलु

माझ पण मन फिरल
प्रेमाच्या नात्यात वरल
विचारच केला नाही बाकीचा
दोघांनी एकमेकांना स्वीकारल

कित्येक दिवस ते माझ्या
अंग खांद्यावर बागडत होत
शरीराचा सुखावा घेत
अश्रुवाटे रडत होत

काही दिवसांनी मला कळल
ही गोष्ट जमणारच नाही
परिस्थितीला काही गोष्टी मान्य नसतात
आपले हे प्रेम लयाला जाणारच नाही

मन झाले दुखी खूप
म्हणाले याला उगीच आणले इथे
चांगले बागडत होत निसर्गात
पुन्हा नेऊन सोडावे तिथे

मला जेव्हा बोलायचे होते
अगोदरच त्याने सगळ जानल
त्याला मुक्त करतानाही
मला त्याने प्रेमातच गनल

ज्या फुलावरून त्याला आणले
त्याच फूलावर त्याला सोडल
सोडतानाही येत रहा इथे नेहमी
कानात हळूच कुजबूजल

नेहमी मी जाताना रस्त्याने
खिन्न मनाने फूलावर दिसते
माझा उदास चेहरा पाहून
गालातल्या गालात हसते

_______________
लक्ष्मण शिर्के

1 comment: