8.27.2009

पाऊस (कविता)

किती दिवस निराश आहे
तो आता येतच नाही
निदान आश्वासन तरी त्याने द्यावे
मला आता सात देतच नाही

आयुष्याच्या वाटेवरून चालताना
त्याची गरज खूपच भासते
नयनी फक्त अश्रुच ओघळतात
त्याचिपण त्याला चाहूल नसते

आता मात्र आम्हा दोघांमध्ये
खूप अंतर मला जाणवते
परिस्थितीचा चटका बसून
माझे रम्य जीवन मला मानवते

तसे पाहायला गेले तर
आम्हात बरेचसे साम्य होते
अधुन मधून जरी तो आला
मन माझे हवेत उडून जात होते

तो कधी माझ्यावर रागावला
मी नेहमीच शांत बसायचो
मग तो थंड थेंबांचा शिडकावा द्यायचा
कितीतरी वेळ मग माझाच मी नसायचो

त्याचा झालेला पहिला स्पर्श
नेहमीच मला आठवतो
जुन्या अठवणींना उजाळा देऊन
मनात पुन्हा पुन्हा साठवतो

पण हल्ली काय झालाय त्याला
वेळेच बंधन सुद्धा टाळतो
मलाच कळ्त नाही माझ काय चुकल
का असा माझ्यावर जळतो

खरच वाटतय मनापासून पुन्हा
हवाहवासा वाटतोय सुखद स्पर्श
दुख मनातले निघून जाऊन
पुन्हा येईल माझ्या जगण्यात हर्ष !!!!!!!

____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment