8.21.2009

वाट तुझी येथेच पाहीन

वाट पाहिली खूप तिचि
पन ती आलिच नाही
कारण पन नाही कळले
काल जाताना काही बोललीच नाही

लहानपनापासुन प्रेम केल
कळेना कुठे कमी पडले
आमच्यात असे अंतर पडन्याइतके
काय असे वितुष्ट घडले

जेव्हा वय असत खेळायच
दोघान्नि एकमेकास प्रेमात मोलल
आतापर्यन्तच्या प्रवासात एकमेकानी
कुणालाच न दुखावता तोलल

घरून चोरून यायची कल्पना
नेहमिच ती मला द्यायची
मी पन मग तसच करायचो
अक्काल माझी चांगली चालायची

कधिच नाही सापडलो आइबाबान्ना
आमच्या प्रेमाचा लपन्डाव
दुनियेलापन जागा नाही ठेवली
आमच्या वर घ्यायला नाव

मी तर नेहमीच चुकायचो
ती मलाच समजवायची
चूक नसली तिची तरी
ती स्वता हून माफी मागायची

आज त्याच गोष्टिची लाज वाटते
यातनेचि चाहुल मनी हासते
खरच मला या क्षनी कळल
तिची एवढि गरज का मज भासते

आतापर्यन्त भरभरून प्रेम दिल
कुठच काही कमी नाही केल
ती आज दिसतच नाही समोर
पन ह्रदय मात्र तीन माझ चोरून नेल

एकदाच तीने इथे यावे
चुकलेल माझ पाउल सांगावी
आनी माझ्या पानावलेल्या डोळ्यान्कडुन
सर्व चुकीँची माफी घ्यावी

आज तू हवी आहेस
वाट तुझी येथेच पाहीन
येशिल तू कधीतरी नक्किच
तुला दिलेल्या वचनाशी एकनिष्ठ राहीन


_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment