इथे या मनुष्यवस्तीत काहीजणांना
शोधूनपण सापडत नाही प्रेम
कारण त्याचा आपल्या जगण्यात
कुठेच नसतो सरळ नेम
म्हणून तर माणसे
नेहमीच प्रेमात फसतात
आणि पूर्ण खोलात जाऊन
वाचवा म्हणत बसतात
आधारसाठी जातो कोणी
तो पण गोत्यात जातो
दुनिया म्हणते त्यालापण
हा पण बघा माती खातो
आजकाल या जगात
कुणाच कुणाला पडले नाही
पण एकमेकांना पाठीमागे
शिन्तोडे उडवायचे सोडले नाही
चांगल जिथे असेल
तिथे पाठ दाखवितात
आणि जे वाईट असेल
त्यातच स्वताला मुकवितात
आजकालची पोरे पण
थोपटातात स्वताची पाठ
आणि पोरीलाच बोलतात
दुसरिशी घालून दे माझी गाठ
प्रेम तर लांबच राहते
असते तिथे टायमपास
मग कधीकधी बेइज्जत होऊन
स्वताच्याच करतात लौकिकाचा र्हास
कविता इथेच संपवीतो माझी
कारण नाही तिला आकार ना उकर
असाच मला कधीकधी येतो
बिना जेवणाचा सुद्धा ढेकर.........
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment