8.04.2009

जेव्हा तुझे नि माझे (कविता)

जेव्हा तुझे नि माझे
सूर होतात एक
मन होऊन वेडे
शब्दांची होते फेक

कोकिलेचा गळा
गातोय कुहुहु
दंग होऊनि मी येथे
लागलो शब्द लिहु

मन माझे वेडे
विचार करते जेव्हा
समुद्राला नदी मिळून
संगम होतो तेव्हा

रात्र झाली फार
झणकरला नाद
श्रोते घेऊ लागले
कवितेचा आस्वाद

______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment