8.04.2009

आम्हाला मराठीचा हाय अभिमान (कविता)

खरा हाय मित्रा तुझे
इथे दुखावतात किती स्वाभिमान
तरी पण सर्वच म्हणतात
आम्हाला मराठीचा हाय अभिमान

अरे किती आले किती गेले
मराठीसाठी सारेच झुकले
झुंज दिली मराठ्यांनीच
कितीतरी प्राणास मुकले

आज तेच मराठी
स्वताचेच लचके तोडतात
आणि आपल्याच मराठ्यांस
शक्य तेवढे मागे ओढतात

काहींना नाही सहन होत
मग ते खुपच चिडतात
रागाचा पारा चढला की
अशांचे वाभाडे काढतात

अजुन मराठा खचला नाही
फक्त जपतोय तो स्वाभिमान
ज्वालामुखी होईल एकदा तरी
तेव्हा दाखवेल तो त्याचा अभिमान

आपली संस्कृती आहे महान
कुठेच राहणार नाही गहाण
आपणच आपले हित राखावे
त्यातच राहील आपली शान ........

-------------------
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment