8.04.2009

कविता म्हणजे (कविता)

कविता म्हणजे शब्द असतात
त्यांना फक्त अर्थ असतात
जरी यमक नाही जुळले
भावना तेथे खुल्या असतात

नसतो तिथे रागाचा उद्रेक
नसतात तिथे मेळावे
प्रेमातुन निघणार्‍या आवाजाचा
फुलांच्या गादीवारुन वाटते पळावे

नसतो तिथे असा झांजावत
नसते तिथे कसलीच वावटळ
असते फक्त न सापडणारे
हवेत घोंगवणारे मृगजळ

एक शब्द छान बोललिस
काय तो बरे " शब्दवेल"
खरेच कवितेतून सर्वच मिळते
कारण तिथे असतो शब्द झेल

_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment