परवा या पावसाने माझी
चांगलीच जिरविली
माझी पावसात जाण्याची हौस त्याने
दोन काड्या मोडून मुरविलि
छत्रि झालेली उलटी बघून
माझेच मला कसेतरि झाले
पाहणार्यांचे मात्र तेथे
मनमुराद हसे झाले
आज सकाळी येताना
शिवून घेतली छत्रि
मनातल्या मनात म्हटल
आता इथून पुढे नीट वाग तरी
सावध राहीन इथून पुढे
होणार नाही पुन्हा
जर का वारा आला
भिजेन पण मिटवेन छत्रिपुन्हा
_____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment