8.04.2009

माझे बालपण ....(कविता)

अजूनही आठवते माझे बालपण
खोड्या काढण्यात होतो पटाईत
आई नेहमीच मागे लागायची
काठी घेऊन घाई घाईत

मला वाटायची मज्जा
पण नाहीतच सापडायचो तिला
गुपचुप येऊन अभ्यासाला बसायचो
जेव्हा राग असेल कमी झाला

शाळेतुन घरी जाताना
सगळे मित्र आम्ही गडे
कधीच नाही सोडायचो
चिंचा-बोरीची झाडे

कधी यायचा आंब्याला पाड
तर जांबळे असलेली पीकायचे
मला कुठे राहावायाचे
जिभेला पाणी सुटायाचे

कुणीही निंदा कुनीही वन्दआ
शाळेत दंगा करणे हाच होता आमचा धंदा
बालपण आठवतच मन जाते भूतकाळात
आणि आठवणी रुतुन बसतात कमळसारख्या गाळात

____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment