8.04.2009

लढवू या मराठीचा किल्ला (कविता)

राहिला बाबा सगळे
नाही रागावत मी
पण आता मराठीची सक्ती
करायची इथे मला जी

आपले वेगळेपण आपण
कधी दाखवणार जगाला
तरुण पिढीचा दम आपला
आता दाखवू सर्वांना

सर्वजण या इथे
एकत्र येऊ सगळे
काहीतरी करून दाखवू
विरोधकांना आगळे

करतो सर्वांना मी
एकच कलकळीचा सल्ला
आता आपण पण एक
लढवू या मराठीचा किल्ला
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment