उठ उठ ताई
आज सोनियाचा दिन
राखी बांधावया माझे
आतुरले आहे मन
तू आहेस माझी
ताई एक सखी
घाई झालीय मला
लवकर बांध राखी
या राखीत मला ताई
दिसतय तुझ प्रतिबिंब
प्रेम आलय उफाळुन
मन झालय चिंब
ताई तुझा राग
असायचा लटका लटका
आणि मग मी चुकलो की
पडायचा एक तरी फटका
ताई आठवतय लहानपणी
खूप ठिकाणी माझी चुक असायची
प्रत्येक चुकीमागे तुझी
एक तर समज असायची
आज पण मला ताई
आठवतोय तो दिवस
तू राखी बांधाताना
बोललेला तो नवस
आज आहे आपल्या
दोघांचाही दिन
किती आनंद होतोय मला
वेडे झालाय मन
भूतकाळातील प्रत्येक क्षणांची
ठेवलीय मी आठवण
मनाच्या कोपर्यात जागा करून
करून ठेवलीय मी साठवण
ताई तुझ्या उपकरांचे
कधी फेडेन मी ऋण
तूच मला शिकविलेस
माज्यात आहेत ते गुण
बांध ताई राखी मला
जीव ओवळतो माझा तुला
देवाला एकाच मागने
सुखी ठेव माझ्या ताई ला..........
______________
लक्ष्मण शिर्के
Mastach...
ReplyDelete