8.04.2009

एकदा एक मोर (कविता)

एकदा एक मोर
म्हणाला तिच्या बायकोला
नेहमी तूच अंडी घालतेस
एकदा तरी घालुदे मला

लांडोर म्हणाली अरे वेड्या
अंडी घालणे सोप नसत
ज्यांना जिथे ठेवलय देवाने
त्यांनाच ते करायचे असत

मोर म्हणाला ठीक आहे
देवच तर सृष्टी चालवतो
तू घालत बस अंडी
मी आपला पिसारा फुलवीतो
______________
लक्ष्मण शिर्के

1 comment: