आज मी असा इथे
शांत उभा आहे
पहाटेचा चंद्र सखा
निरोप घेत आहे
तव अंगी शीतलाता
शांत मज वाटे
विचार करून थकलो
अंगावर शहरती काटे
या शांत मालावर
एकांत मज मिळाला
साथ देण्यास मला
हा चंद्र धावूनि आला
मन गेले हेलावूनि
परतिचा चंद्र पाहुनि
जात होता मला
एकांतात सोडूनि
नयनी अश्रू दाटले
मन माझे गहिवरले
अंधार झाला सभोवर
मीच मला तरिले
___________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment