8.04.2009

फाजिती (कविता)

ती आली अन् मला म्हणाली
चल पावसात भिजू
दोघेच आहोत आपण इथे
नकोस आता तू लाजू

मी म्हणालो नको बाई
मी नाही ग लाजत
आजारी पडेन भिजालो तर
नाही मी पावसात भिजत

माझा हात धरून तिथे
ओढून मला नेले
काही क्षणातच सर्वांग
चिंब चिंब झाले

हसत हसतम्हणाली
आता कसा वाटताय
नाच की आनंदात पावसात
तुज़े अंग का थरतरताय

मला कळेना माझे
याला हूड हूड म्हणावी की भीती
मलाच माझी लाज वाटली
पोरगीपुढची पाहून फाजिती

_______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment