मी नशिबाला मानतो तुम्ही मानता की नाही
मला माहीत नाही
मी स्वतला जाणतो तुम्ही जाणता की नाही
मला माहीत नाही
एकांत असेल तेव्हा मी समुद्रकिनारी बसतो
तुम्ही बसता की नाही मला माहीत नाही
समुद्राच्या लाटांशी जीवनाचे गणित मांडतो
तुम्ही मांडता की नाही मला माहीत नाही
मी राजकारणी लोकांचा किळस करतो
तुम्ही करता की नाही मला माहीत नाही
वेळ आल्यास त्यांना शिव्या देत एकटाच बसतो
तुम्ही देता की नाही मला माहीत नाही
मी नेहमीच समाजाबरोबर चालतो
तुम्ही चालता की नाही मला माहीत नाही
त्यांनी घालून दिलेल्या संस्कृतीच्या चाकोरीत मलाच बसवितो
तुम्ही तुम्हास बसविता की नाही मला माहीत नाही
मोकळ्या वेळात मी गाणी म्हणत बसतो
तुम्ही म्हणता की नाही मला माहीत नाही
त्या गाण्यांच्या तालावर मी निसर्ग नाचताना पाहतो
तुम्ही पाहता का नाही मला माहीत नाही
एखाद्यावर अन्याय होताना डोळ्यात अश्रू येतात
तुमच्या येतात की नाही मला माहीत नाही
थरतरत्या श्वासांनी मी मूकपणे पाहत राहतो
तुम्ही पाहता की नाही मला माहीत नाही
समोरच्याशी बोलताना मी नेहंमीच त्याच्या डोळ्यात बघतो
तुम्ही बघता की नाही मला माहीत नाही
त्याचे डोळ्यातिल भाव जाणूनच पुढे बोलायचे ठरवीतो
तुम्ही ठरविता की नाही मला माहीत आहे
मी नेहमीच माझ्या आवडत्या विषयावर बोलताना विषयात शिरतो
तुम्ही शिरता की नाही मला माहीत नाही
आणि एका विषयातून दुसरया विषयावर भरकटत जातो
तुम्ही जाता की नाही मला माहीत नाही
ओर्कुट्वर असताना मी नेहमीच माझे काम विसरून
तुम्ही विसरता की नाही मला माहीत नाही
आणि मग अधूनमधून बॉसचा बोल खातो
तुम्ही खाता की नाही मला माहीत नाही
मला माहीत नाही की तुम्ही काय करता
कारण मी तुमचा फक्त मित्र आहे
कुठल्याही गोष्टी मन लावून करा
हेच तर सुखी जीवनाचे सूत्र आहे............... ............!!!!!
_________________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment