एकाच सांगणे आहे तुला
प्रेमाने माफ कर मला
माझ्या हातून झालाय गुन्हा
होणार नाही कधी पुन्हा
तुझ मन मी जाणले
माझ्या मनातलही तू मानले
दोघांच्या मनातील विचारांनी
आपणास किती जवळ आणले
वाटल नव्हते मला कधी
मनाचा तोल इतका जाईल
प्रेम करून मन माझ
इतके बुडून जाईल
पण आता मला कळाले
प्रश्नाचे उत्तर मला मिळाले
भूतकाळातील माझे विचार
मला स्वतालाच सोडून पळाले
तू प्रेमाने स्वीकार केला
मी प्रेमाने नकार दिला
पण हा नकार देताना
अर्धवट होकार झाला
नकार तुला दिला
हाच गुन्हा मी केला
पण या गुन्हयालाच तू
पुन्हा प्रतिसाद दिला
जरी नाही झाल आपल
प्रियकर प्रियेसीच प्रेम
नेहमीच आपण राहू
मित्रासारखे सेम
प्रेम करतोय तुझ्यावर
प्रेमात पडलो नाही
शेवटपर्यंत मित्र असें तुझा
बस !!!! बाकी काही नाही...........
____________
लक्ष्मण शिर्के
Surekh re Jit.......... Mast aahe Kavita!
ReplyDelete