1.07.2010

माणुसकीला जपून ठेवायच (कविता)

ठरवल होत बरच काही
मातीतल्या माणसातच राहायच
त्या रूक्ष मातिसन्गे खेळत
निसर्गातुन मंजुळ गीत गायच

चिखलात रुतनार्‍या कमळाप्रमाणे
मूळ घट्ट धरून राहायच
माणसाला दुरून मात्र
आपनातील सौंदर्य दाखवायच

पंखात बळ घेऊन
देशात या भरकटायच
दिवस रात्र मुलूख आठवत
कल्पनेच्या गावात राहायच

खुल्या या आसमन्तात
पक्षी बनून विहारायच
आकाशातुन सृष्टी कशी दिसते
डोळ्यातून सुख चाखायच

मिटलेल्या श्वासांना पुन्हा
जिवंत अस्तित्वात आनायच
भावभावनांच्या या खेळात
भरभरून रन्गायच

नदीत जाऊन डुंबून
पुन्हा काठावर यायच
मिळनार्‍या त्या आनन्दाला
पुन्हा पुन्हा भिडायच

स्वप्न पाठीशी घेऊन
पुन्हा पुन्हा परतायच
काही वेगळे करता आले नाही तरी
माणसातल्या माणुसकीला जपून ठेवायच

___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment