1.30.2010

सलाम त्या झेंड्याला

आईपासुन दुर राहुन
आईची मुर्ती रोज डोळ्यात साठवतो
मनाला कधी वाईट वाटले की
तिच्या मायेचा हात मनात आठवतो
___________
लक्ष्मण शिर्के

आई बाबांचा विश्वास
नेहमीच सार्थ होणार
आपल्यासाठी झिजविलेले मोल
फुकट वाया नाही जाणार
___________
लक्ष्मण शिर्के

मुक्कामाला पोहोचायची
ओढ ही नेहमीच असते
ती एक मानवाची
अंगभुत सवय असते
___________
लक्ष्मण शिर्के

देशाचा तिरंगा अभिमानाने
जेव्हा हवेत फडफडला
हात मस्तकी सलामीस जावुन
नजरेचा रोख आकाशी भिडला
___________
लक्ष्मण शिर्के

सलाम त्या झेंड्याला
सलाम त्या वीर जवानांना
देशासाठी रक्त सांडणारया
सलाम त्या कट्टर मनांना
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment