निज निज सखे मला झोप येत नाही
विचार करुदे आता मला आयुष्याचा काही
का आलो असे आपण घरच्यांना जुमानुन
प्रेमळ त्या पाल्यांना तोडले आपल्या प्रेमाला मानुन !!
काय बरे चुक झाली मोठे करुन त्यांची
कुठे ते कमी पडले देण्यास रोजीरोटी
पोटाची तिडिक पाहुन नाही पाहिली तळहातची फ़ोडी
म्हनुन का आपणच विस्कटवतोय आपल्या कुटुंबाची घडी
विचार कर आयुष्याचा कसे राहु आयुष्यभर
जन्मदात्यांनापन आठव नको स्मरु वरवर
अल्लड या प्रेमापोटी आपणच चुकलो आहे
दोन दिवसही वाटुन राहिलेत आयुष्यालाच मुकलो आहे
रागावले आई बाबा विचार जेव्हा सांगितला
क्षणिक रागापाई आपण अविचारी निर्णय घेतला
काय वाईट सांगत होते आतापर्यंत सांभाळ केला
चार दिवसांच्या प्रेमासाठी त्या प्रेमाचा विसरच झाला
उठ उठ सखे जाऊ आपण आपुल्या घरा
नकोय आपणास असा हा एकांतातला निवारा
तुझ्या माझ्या जन्मदात्यांनी आटवलाय प्रेमाचा झरा
प्रवास आपल्या प्रेमाचा कुटुंबासमवेतच बरा
___________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment