1.30.2010

कविता तर करायचीय मला (कविता)

कवितेला विषय काय घेवु... कशावर करु...
प्रेम, स्वप्न, शब्द, दिशा, विरह, मन...... आणखी कशावर....
मनात असंख्य कल्लोळ उठताहेत...
कविता तर करायचीय मला.. कशावर करु...

प्रेम... कोरया कागदावर खरकटायचे काहीतरी
त्यातुन काय निष्पण्ण होणार..
त्याचा गंधच लोपुन गेलाय..
काय आता त्यापासुन साकार होणार...
मनात असंख्य कल्लोळ उठतायेत ...
कविता तर करायचीय मला.. कशावर करु...?

स्वप्न... पुर्वी स्वप्नांना उधान यायच...
समुद्राला येते तशी भरती यायची...
पण आता ओहोटीनंतर लवलेशही नाही...
पुन्हा स्वप्नांची दुनिया कधि फुलायची....
मनात असंख्य कल्लोळ उठतायेत...
कविता तर करायचीय मला.. कशावर करु...?

शब्द... शब्द शब्दांच्या कितीतरी चकमकी झाल्या
मोसमाप्रमाणॆ शब्द माझे फुलायचे
आता शब्दच वाटतात कित्येकदा परके
जरी ईच्छा असली शब्दांशी झुलायचे....
मनात तर असंख्य कल्लोळ उठतायेत...
कविता तर करायचीय मला.. कशावर करु...?

दिशा... कुठल्याही कामाची अन जीवनाची दिशा
आतापर्यंत विचाराने योग्यच ठरली जाणार
आता वाटच सापडत नाही यशस्वीतेची
बहुतेक ठरविलेली ध्येये अपुरीच राहणार...
मनात तर असंख्य कल्लोळ उठतायेत...
कविता तर करायचीय मला.. कशावर करु...?

विरह... विरह हा नेहमीच चांगला असतो म्हणे
सदासर्वदा मी ऐकत आलो आहे...
अनुभव घ्यायला नेहमीच मी उत्साही
कोण जाणे नशिबात काय लिहिले आहे...
मनात तर असंख्य कल्लोळ उठतायेत...
कविता तर करायचीय मला.. कशावर करु...?

मन... अशी गोष्ट की नेहमीच मला फसविते
अजुनही मनामनात होतोय नेहमी संघर्ष
वाट पाहतोय ते कधी घेतय....
उज्ज्वल सुखाचा परामर्श.......................
मनात तर असंख्य कल्लोळ उठतायेत...
कविता तर करायचीय मला.. कशावर करु...?
________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment