1.25.2010

मैत्री तोडु नकोस (कविता)

दुर असताना खुप काहीस बोलायच सुचत
जवळ आल्यावर डोळ्यात पाणी साचत
मन विषन्न होत काय बोलाव तेच कळत नाही
तु जवळ असताना जीभच वळत नाही

किती तरी वेळा बोलाव बोलाव म्हणतो
धैर्य याव म्हणुन पुन्हा पुन्हा गुणगुणतो
कातरवेळी भेटल्यावर जेव्हा नजरेत पाहतो
आखुन ठेवलेले शब्दच मी विसरुन जातो

मी तुझ्यावर प्रेम करतो तुला तरी कळु दे
शब्दांची अपुर्ण वाट तुझ्याकडुन तरी मिळु दे
खुप वेळा म्हणतेस "एव्हरीथिंग इज पोसिबल"
जिवनातली ठरविलेली ध्येये तुझ्यासवे मिळु दे

प्रेम करतोय तुझ्यावर राग मानु नकोस
काही नसले मनात तर आग ओकु नकोस
समजुन घे मला भेटायच सोडु नकोस
काही असो तुझ्या मनात पण मैत्री तोडु नकोस
____________
लक्ष्मण शिर्के

1 comment: