कुठे चाललीस? का? माझ काय चुकलं?
सांगशील तरी काय द्यायच माझ्याकडुन चुकलं?
प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मायेचा हात
काय हव होत तुला
वेळोवेळी सर्वच देत होतो
का सांगत नाहिस मला.........
तरिपन एकदा सांग माझ प्रेम कशात मुकलं
सांगशील तरी काय द्यायच माझ्याकडुन चुकलं?
तु पहिल्याच भेटीत बोलली होतीस
मला कधीच सोडु नको
फक्त एकच मनापासुन मागणी केलीस
विश्वास कधीच तोडु नको
त्यावेळीच माझ मन तुझ्या ह्रदयाशी पुर्णता झुकलं
सांगशील तरी काय द्यायच माझ्याकडुन चुकलं?
रास ही जीवनाची तुझ्याबरोबर
आतापर्यंत रचत राहिलो
तुझ्या मनातले बोल अन सुर
नेहमी प्रमाणे वाचत राहिलो
माझ मन तुझ्या मनात अजुनही का नाही टिकलं
सांगशील तरी काय द्यायच माझ्याकडुन चुकलं?
तुझ्या प्रत्येक शब्दाला मी
वेड्यासारखा जागत होतो
तु पन मनापासुन प्रेम करायचीस
क्षणोक्षणी तुला प्रेम मागत होतो
देव जाणे आजच तुझ्या मनाने काय आखलं
सांगशील तरी काय द्यायच माझ्याकडुन चुकलं?
वाट पाहत होतो त्या दिवसाची
आईबाबांना आनंदान हसताना पाहायच होत
आपण दोघांनी उत्साहात मिळुन जोडीने
त्यांच्यापुढे आशिर्वादासाठी उभ राहायच होत
त्या विचारांच्या कळीच स्वप्न उमलण्याअगोदरच सुकलं
सांगशील तरी काय द्यायच माझ्याकडुन चुकलं?
________________
लक्ष्मण शिर्के
mastch....
ReplyDelete